Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. अशोक सोनवणे यांचा संभाजी ब्रिगेडकडून सन्मान

जामखेड ः दैनिक लोकमंथन समुहाचे संस्थापक तथा मुख्य संपादक डॉ. अशोक सोनवणे यांचा जामखेडमध्ये संभाजी ब्रिगेडकडून पुस्तक भेट देवून संभाजी ब्रिगेडचे प

आई जगाचा पोशिंदा तर शेतकरी बाप व दिशा देणारा शिक्षक ः सुनील कडलग
मोटार वाहन निरीक्षक आयेशा हुसैनवर अफरातफरीचा गुन्हा
छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार आचरणात आणा- आ.  खताळ

जामखेड ः दैनिक लोकमंथन समुहाचे संस्थापक तथा मुख्य संपादक डॉ. अशोक सोनवणे यांचा जामखेडमध्ये संभाजी ब्रिगेडकडून पुस्तक भेट देवून संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत यांनी सन्मान केला. यावेळी झालेल्या चर्चेच्यावेळी डॉ. अशोक सोनवणे म्हणाले की, राज्यात वारकर्‍यांवर लाठीमार, अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली असून, या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातून सामाजिक अशांतता वाढीसाठी काही शक्तींकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र याला राज्यकर्त्यांनी आवर घालण्याची गरज असल्याचे मत त्यांनी नोंदवले. सामाजिक, राजकीय,आर्थिक विषया सह अनेक विषयांवर सडेतोड मत डॉ. सोनवणे या छोटेखानी बैठकीत केले.

राज्यात सामाजिक धुव्रीकरणाचा प्रयत्न ः डॉ. सोनवणे – जामखेड भेटीत डॉ. अशोक सोनवणे यांनी राज्यातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर सखोल आणि अभ्यासपूर्ण भाष्य करतांना, राज्यात सर्वच पक्षांकडून सामाजिक धु्रवीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मत मांडले. राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सर्वच पक्षांकडून सुरू असल्यामुळे सामाजिक वातावरण गढूक करण्याचा प्रयत्न सुरू असला तरी, ते सामाजिक हिताचे नसल्याचे स्पष्ट आणि रोखठोक मत त्यांनी यावेळी मांडले.

COMMENTS