Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेल्वे प्रवाशांच्या अडचणी सोडविण्यावर भर द्यावा

सल्लागार समिती सदस्यांचे आ. आशुतोष काळेंनी केले अभिनंदन

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव रेल्वे स्टेशनच्या स्थानिक सल्लागार समितीच्या सदस्यांची रेल्वेच्या सोलापूर कार्यालयाने निवड केली असून या सर्व नवनिर्वा

राज्यातील 29 महापालिका क्षेत्रात मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी
पाट-पाण्याच्या आर्वतनांचे काटेकोर नियोजन करावे
हद्दपार आरोपी वाळू चोरी करताना जेरबंद; राहुरी पोलिसांची कारवाई; ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव रेल्वे स्टेशनच्या स्थानिक सल्लागार समितीच्या सदस्यांची रेल्वेच्या सोलापूर कार्यालयाने निवड केली असून या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले आहे.
निवड झालेल्या या सदस्यांमध्ये माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, कैलास ठोळे, सेवा सिंग सहानी, सुधीर डागा, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, धनंजय कहार, किरण बिडवे, आदी सदस्यांचा समावेश आहे. रेल्वे प्रवाशी केंद्र स्थानी ठेवून रेल्वे प्रवाशांच्या अडचणी सोडविण्यावर भर द्यावा. कोपरगाव रेल्वे स्टेशनवरून कोपरगाव शहर व तालुक्यातून हजारो रेल्वे प्रवाशी, साई भक्त तसेच कोपरगाव रेल्वे स्टेशनवरून उद्योग व्यवसायासाठी पुणे, मुंबई व मोठ्या शहरात नियमित रेल्वेने प्रवास करणार्‍या हजारो प्रवाशांना इतर रेल्वे स्टेशनवर मिळणार्‍या सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नवनिर्वाचित स्थानिक सल्लागार समितीच्या सदस्यांनी रेल्वे प्रशानाच्या माध्यमातून प्रयत्न करावे असा सल्ला आ. आशुतोष काळे यांनी दिला आहे.

COMMENTS