साकत शिवारातील पेट्रोल पंपावर दरोडा ; अडीच लाखाचा ऐवज लुटला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साकत शिवारातील पेट्रोल पंपावर दरोडा ; अडीच लाखाचा ऐवज लुटला

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर- सोलापूर रोडवर साकत शिवारात असलेल्या केतन भारत पेट्रोलियम पेट्रोल पंपावर दरोडा पडला. सुमारे अडीच लाखाचा ऐवज लांबवण्यात आला. य

महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या फुले 10001 ऊस वाणास राष्ट्रीय पातळीवर मान्यता
Ahmednagar : सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना शासकीय कामासंदर्भात अडचण भासू देणार नाही l LokNews24
पिपल्स रिपब्लिकन पार्टीचा प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या उपस्थितीत 15 रोजी जिल्हा मेळावा

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर- सोलापूर रोडवर साकत शिवारात असलेल्या केतन भारत पेट्रोलियम पेट्रोल पंपावर दरोडा पडला. सुमारे अडीच लाखाचा ऐवज लांबवण्यात आला. या पंपातील केबिनच्या कौंटरवरील कर्मचार्‍यांना मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाईल तसेच पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या ट्रक चालकांना मारहाण करुन त्यांच्याकडील रोख रक्कम व मोबाईलसह अन्य ऐवज पिस्तुलाचा धाक दाखवून तसेच दमदाटी व मारहाण करुन चोरून नेला गेला. येथून दोन लाख 55 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना शनिवारी (दिनांक 31 जुलै)रात्री तीन वाजता घडली. यावेळी चोरट्यांच्या मारहाणीत एकजण जखमी झाला.
याबाबतची मिळालेली माहिती अशी की नगर-सोलापूर रोड वरील साकत शिवारातील केतन भारत पेट्रोलियम पेट्रोलपंपावर पहाटे तीनच्या सुमारास सहा ते सात अनोळखी चोरटे आले. त्यांनी पेट्रोल पंपावरील कर्मचार्‍याला मारहाण करून व त्याला पिस्तुलाचा धाक दाखवून त्याच्याकडील रोख रक्कम बळजबरीने काढून घेतली तसेच पेट्रोल पंपाच्या केबिनमध्ये घुसून काउंटरमधील 1 लाख 47 हजार रक्कम बळजबरीने चोरून घेतली. योगेश चौधरी (राहणार हडपसर, पुणे) याच्या उशाला असलेल्या बॅगमधून पन्नास हजार रुपये रोख व खिशातील तीन हजार रुपये असलेले पैशाचे पाकीट, त्यातील पॅन कार्ड, आधार कार्ड, अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम व इतर बँकेचे एटीएम कार्ड काढून घेतले. तसेच टाटा कंपनीच्या आयसर टॅम्पोवरील चालक गणेश जाधव (रा गुंजेगाव, ता. जि. सोलापूर) यांच्याकडील 2 हजार 500 रुपये व सॅमसंग कंपनीचा 3 हजार रुपये किमतीचा मोबाईल व 500 रुपये किमतीच्या चांदीच्या दोन अंगठ्या असा ऐवज बळजबरीने लुटला. यावेळी पेट्रोल पंपावर थांबलेले टेम्पोचालक (एमएच 45 एइ 0900) दत्तात्रय जाधव (राहणार खंडाळे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) याच्याकडील 1800 रुपये व चार हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल चोरट्यांनी चोरून नेला तसेच विजय कुमार (राहणार तामिळनाडू ) याचा दहा हजार रुपये किमतीचा आयफोन, मोहनसिंग याच्या खिशातील तेरा हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाइल तसेच गणेश हरीसिंह सिसोदिया (रा. छेडी, ता. गनवाणी, जिल्हा धार, मध्य प्रदेश) यांच्या खिशातील पंचवीस हजार रुपये रोख व अविनाश काळे यांना पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण करून त्यांच्याकडील तीन हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल बळजबरीने काढून घेतला. यावेळी झालेला मारहाणीत अविनाश काळे जखमी झाले. चोरट्यांनी एकूण दोन लाख 55 हजार 800 रुपयाचा ऐवज लुटून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत हे पोलीस पथकासह घटनास्थळी तातडीने पोहोचले. घटनास्थळाची पाहणी करून घटनेबाबत चौकशी करून अधिक माहिती घेतली व दरोडेखोरांच्या शोधण्यासाठी पोलीस पथक रवाना केले. या प्रकरणी नगर तालुका पोलिसांनी पेट्रोल पंपमालक अक्षय गोल्हार (वय30 वर्षे, रा.कोहिनूर मंगल कार्यालयासमोर (पाईप लाईन रोड, नगर) यांच्या फिर्यादीवरून दरोड्याच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप करीत आहेत.

चोरट्यांनी सीसीटीव्ही नेले
साकत दरोड्यातील सहा ते सात आरोपींनी पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा चोरून नेले आहेत. या दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या काळे यांच्यावर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. पोलिसांची पाच पथके आरोपींच्या शोधार्थ पाठवण्यात आली आहेत. रात्री अडीच-तीनच्या सुमारास हे दरोडेखोर पंपावर आले. या ठिकाणी अविनाश काळे तेथे होते. आम्हाला डिझेल भरायचे आहे, असे त्यांनी सांगितले. डिझेल भरण्यासाठी काळे त्यांच्या गाडीजवळ गेले असता त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांना जखमी केले. आरोपींपैकी दोन जणांकडे रिव्हॉल्वर होते. साधारणतः अर्धा तासाहून अधिक काळ हे चोरटे त्या ठिकाणी होते. केबिनमध्ये जे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते, तेसुद्धा त्यांनी काढून टाकले. विशेष म्हणजे याच केबिनमध्ये असलेले सीसीटीव्हीचे डीव्हीआर सुद्धा चोरून नेले. काही मौल्यवान वस्तू सुद्धा या केबिनमध्ये होत्या, त्या सुद्धा पळविल्या. चोरट्यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून इतर कर्मचार्‍यांना दमदाटी करत एका बाजूला रोखून धरलेले होते. त्यामुळे कुणालाच काही करता आले नाही. ज्या गाडीतून हे चोरटे आलेले होते, त्याच गाडीतून ते बहुदा सोलापूर रोडच्या दिशेने गेले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचा अंदाज असून, नगर तालुक्यासह स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक आरोपींच्या शोधासाठी पाठविण्यात आलेले आहे. यापैकी एका आरोपीच्या डोक्यावर जखमेचे निशाण आहे. त्यामुळे परिसरामध्ये काही सीसीटीव्ही फुटेज मिळू शकते का किंवा काही धागेदोरे मिळतात का, यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. दहिगाव साकतपासून काही अंतरावर असलेल्या घरांपैकी कोठे सीसीटीव्ही आहेत काय याचीसुद्धा माहिती पोलिस घेत आहेत.

COMMENTS