नगर अर्बन बँक शेवगाव शाखेचे व्यवस्थापक यांनी केली आत्महत्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर अर्बन बँक शेवगाव शाखेचे व्यवस्थापक यांनी केली आत्महत्या

शेवगाव तालुका प्रतिनिधी : नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेचे व्यवस्थापक गोरक्षनाथ सूर्यभान शिंदे (वय 58, रा. भातकुडगाव, ता. शेवगाव) यांनी विषारी औषध घे

नगरच्या डॉक्टरांचे जामीन अर्ज फेटाळले
माझा दोष नाही…माझी फसवणूक झाली…मला माफ करा…
नगर अर्बन बँकेचे निवडणूक रिंगण लागले फुलू…; इच्छुकांनी साधला गुरुपुष्यांमृत योग, 48 अर्ज दाखल

शेवगाव तालुका प्रतिनिधी : नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेचे व्यवस्थापक गोरक्षनाथ सूर्यभान शिंदे (वय 58, रा. भातकुडगाव, ता. शेवगाव) यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार दि. 27 रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने शेवगाव तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मयत गोरक्षनाथ शिंदे यांच्या खिश्यामध्ये आत्महत्येपुर्वी लिहहिलेली एक चिठ्ठी आढळली आहे. मात्र या चिठ्ठीत काय लिहिले याबाबत समजू शकले नाही. याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर अर्बन बँक शेवगाव शाखेचे व्यवस्थापक गोरक्षनाथ सूर्यभान शिंदे (रा. भातकुडगाव, ता. शेवगाव) हे दि. 31 मे 2021 रोजी सेवा निवृत्त झाले होते. मात्र बँक प्रशासनाने त्यांचा सेवाकाळ तीन महिण्यासाठी वाढवून दिला होता. आज मंगळवार दि. 27 रोजी सकाळपासून गोरक्षनाथ शिंदे हे घरातून बाहेर पडले होते. सकाळपासून ते घरी न आल्यामुळे त्यांच्या घरच्यांनी शोध घेतला असता दुपारी 3.30 वाजेच्या दरम्यान शेतामध्ये त्यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. या दुदैवी घटनेची माहिती शेवगाव तालुक्यास जिल्ह्यात समजताच एकच खळबळ उडाली. याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शेवगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे. आत्महत्येपुर्वी गोरक्षनाथ शिंदे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये काय मचकूर आहे, ते समजू शकले नाही. यामुळे चिठ्ठीत कोणाचे नाव आहे? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र याबाबत पोलिसांकडून मौन पाळले जात आहे.

COMMENTS