जिल्हाचा महसूल विभाग अव्वल…चक्क लाचख़ोरीतही…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हाचा महसूल विभाग अव्वल…चक्क लाचख़ोरीतही…

41 सरकारी कर्मचार्‍यांना पैसे घेताना पकडले, जिल्ह्यात 175 जणांवर कारवाईअहमदनगर/प्रतिनिधी : जिल्हाभरातील विविध करांच्या वसुलीत नेहमी अव्वल असणारा व या

पुणे-संगमनेर-नाशिक रेल्वे होणार… जमिनीसाठी शेतकर्‍यांना नोटिसा
मढी येथे आज भटका जोशी समाजाचा मेळावा – राजेंद्र जोशी
राज्यस्तरीय वरिष्ठ तायक्वांदो स्पर्धेत नगरला सुवर्णपदके

41 सरकारी कर्मचार्‍यांना पैसे घेताना पकडले, जिल्ह्यात 175 जणांवर कारवाई
अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्हाभरातील विविध करांच्या वसुलीत नेहमी अव्वल असणारा व या प्रभावी वसुलीबद्दल राज्य सरकारकडून सन्मान स्वीकारणारा जिल्ह्याचा महसूल विभाग दुर्दैवाने आणखी एका स्तरावर अव्वल आला आहे. लाचखोरीच्या प्रकारातही अव्वल येण्याची नामुष्की जिल्हा महसूलवर आली आहे. जिल्ह्यातील तब्बल 41 सरकारी कर्मचार्‍यांना नागरिकांची कामे करताना पैसे घेताना पकडण्यात आले आहे. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागील पाच वर्षात जिल्ह्यात तब्बल 175जणांना लाच घेताना पकडले. लाचखोरीच्या शर्यतीत जिल्ह्याचा महसूल विभाग अव्वल ठरला आहे. सर्वसामान्यांपासून अनेकांची महत्वाची कामे सरकारी कार्यालयाशी संबंधितच असतातच. यातच आपले काम करून घ्यायचे असेल तर सरकारी बाबूला खूष करावेच लागते नाहीतर काम कसे होणार, हे आता नित्याचेच झाले आहे. जगभरात कोरोनाचे संकटाने प्रत्येकाला जर्जर करून सोडले असले तरी मात्र या काळातही लाचखोरीत नेहमीच सर्वात पुढे असणारा सरकारी विभाग म्हणजे महसूल विभाग यंदाही या शर्यतीत आपले स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरला आहे. अर्थात ही नामुष्कीची बाब आहे.

175 जणांवर कारवाई
गेल्या साडेपाच वर्षांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यात तब्बल 175 सापळा कारवाई करीत लाचखोर लोकसेवकांना कारागृहात पाठवले.ज्या लाचखोर लोकसेवकाविरोधात तक्रार केली जाते, ते लाचलुचपतच्या सापळ्यात अडकतात; मात्र असे अनेक जण आहेत, जे सरकारी कामाचे पैसे घेतात, मात्र सापडत नाहीत. कारण, तक्रारी आल्याशिवाय लाचलुचपत विभागही कारवाई करू शकत नाही. 2016 मध्ये जिल्ह्यातील विविध सरकारी कार्यालयांतील तब्बल 41 जण लाच घेताना रंगेहाथ सापडले. कोरोनाकाळात 2020 मध्ये 32 कारवायांत 37 जण तर जुलै 2021 पर्यंत 21 कारवायांत 28 जणांवर लाचेची कारवाई झाली आहे. यातून लॉकडाऊनकाळातही लाचखोरी जोमात असल्याचे पाहावयास मिळाले. क्लासवन अधिकार्‍यांपासून ते चतुर्थ श्रेणीतील कर्मचारीही लाच घेताना अडकले आहेत.
महसूल विभागाशी नागरिकांचा सततचा संपर्क येत असतो. जमिनीचे वाद, वारसनोंदी, जमीन खरेदी-विक्री नोंदी वा अन्य विविध प्रकारची सततची कामे महसूल विभागात होत असतात. कार्यालयात कामे घेऊन येणारे हे सर्वसामान्य शेतकरी असतात. या शेतकर्‍यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जाते. एखादा शेतकरी चाणाक्ष असेल तरच तो लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे धाव घेतो व तक्रार देतो. अन्यथा, निमूटपणे पैसे देऊन काम मार्गी लावण्यास प्राधान्य दिले जाते.

थोरात-भोसलेंसमोर आव्हान
राज्याच्या महसूल विभागाचे नेतृत्व जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे मंत्रिपदाच्या माध्यमातून करीत असून, जिल्हा महसूलचे नेतृत्व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले हे करीत आहेत. त्यामुळे महसूल विभागातील वाढती लाचखोरी रोखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. कारण, लाचखोरीत जिल्ह्याचा महसूल विभाग अव्वल असणे त्यांच्याही दृष्टीने नामुष्कीचीच बाब आहे.

COMMENTS