Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कायदा मंत्रिपदावर बसू शकेल अशी व्यक्तीच केंद्राकडे नाही – संजय राऊत

मुंबई प्रतिनिधी - सामान्यांचा आवाज जर मी उठवला असेल त्यासाठी मला शिक्षा होणार असेल तर माझी तयारी आहे.  मी विधिमंडळाला चोरमंडळ असं म्हटलेलं ना

संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत वाढ.
Sanjay Raut : लखीमपूर घटनेत सरकार कोणाला वाचवतंय?
संजय राऊत यांना ईडीचा दणका

मुंबई प्रतिनिधी – सामान्यांचा आवाज जर मी उठवला असेल त्यासाठी मला शिक्षा होणार असेल तर माझी तयारी आहे.  मी विधिमंडळाला चोरमंडळ असं म्हटलेलं नाही. घटनाबाह्य पद्धतीने ते विधिमंडळात गेले आणि सरकार बनविला ते चोर मंडळ आहे ही माझी भूमिका आहे. संपूर्ण विधिमंडळाने स्वतःला चोरमंडळ म्हणून घेणे हे चुकीचं आहे.  समिती समोर मी माझी बाजू मांडेल. घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने घटनेची रखवाली करायची असते. परंतु , या पदावर बसलेले व्यक्तीच घटनेचे मारेकरी ठरत आहेत.विधानसभेचे अधिवेशन सुरू नाही. तरीदेखील परदेशात आणि देशात अध्यक्ष हे अनेक मुलाखती देत आहेत आणि त्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे. विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्याकडे असलेल्या घडलेल्या संदर्भात जाहीर भाषण करू नये असे संकेत आहेत. त्यांना अभ्यास करण्याची काहीच गरज नाही, जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा तेच अध्यक्ष होते. चांगला घटना तज्ञ असता तर 24 तासात हे प्रकरण आटोपला असतं. कायदामंत्रिपदावर बसू शकेल अशी व्यक्तीच केंद्राकडे नाही आहे. 

COMMENTS