Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गणेश कारखान्यासाठी शेतकरी संघटना मैदानात

अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस

कोपरगाव प्रतिनिधी ः  राहाता तालुक्यातील शेतकर्‍यांची कामधेनू समजल्या जाणार्‍या गणेश सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून नाम

बोठेविरुद्ध 300 पानी दोषारोपपत्र झाले तयार
प्रभागातील विकास कामांचा लेखा-जोखा जनतेसमोर मांडणे नगरसेवकांचे आद्य कर्तव्य – आ.संग्राम जगताप
वडगाव गुप्ता येथे युनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीने जनसुरक्षा अभियान संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी ः  राहाता तालुक्यातील शेतकर्‍यांची कामधेनू समजल्या जाणार्‍या गणेश सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून नामनिर्देशन पत्र भरण्यास15 मे पासून सुरुवात झाली असून त्यासाठी शेतकरी संघटना त्यासाठी सरसावली असून त्यांच्या श्रीरामपूर कार्यालयात इच्छुकांनी मंगळवारी मोठी गर्दी केली असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी दिली आहे.
    राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम नुकताच सहकार विभागाने जाहीर केला असून नामनिर्देशन पत्र भरण्यात ि15 मे पासून सुरुवात झाली असून ते भरण्याचा अखेरचा दिवस 19 मे सकाळी 11 ते दुपारी 03 पर्यंत असून आलेल्या अर्जाची छाननी दि.22 मे रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होणार असून नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा 23 मे ते 06 जून 2023 पर्यंत दुपारी 03 वाजे पर्यंत आहेत तर निवडणूक दि.17 जून रोजी सकाळी 08 ते दुपारी 05 वाजे पर्यँत संपन्न होणार असल्याची माहिती पुणे येथील राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ.बी.एल.खंडांगळे यांनी नुकतीच जाहीर केली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रांतील इच्छुक नेत्यांनी आपल्या संघटन बांधणीस प्रारंभ केला आहे. त्यासाठी शेतकरी संघटनेने त्यासाठी गेले अनेक दिवसापासून सुरुवात व ईच्छुकांची जमवाजमव करण्यास सुरुवात केली आहे. शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांनी या पूर्वीच अशोक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुक लढवली आहे.त्यात त्यांच्या नेतृत्वाखाली सभासदांनी मोठा प्रतिसाद दिल्याने शेतकरी संघटनेच्या नेत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यांनी या वेळी श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत लक्षवेधी कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून या निवडणुकीत सभासदांना मोठी अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांनी गणेश सहकारी साखर कारखान्यात आपले भविष्य आजमविण्याचे ठरवलेले दिसत आहे.त्यासाठी सभासदांनी त्यांना आग्रह केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यानुसार त्यांनी राहाता तालुक्यातील श्री क्षेत्र वाकडी येथील प्रसिद्ध खंडोबा देवस्थान येथील सभागृहात व राहाता येथील एकनाथ मंगल कार्यालयात नुकतीच शेतकर्‍याच्या जनजागृती सभेचे आयोजन केले होते. त्यानंतर हि गणेश सहकारी कारखण्याची निवडणूक जाहीर झाली आहे.त्यानंतर त्यांच्या गोटात मोठी वर्दळ वाढली आहे.

त्यासाठी आज त्यांच्या कार्यालयात शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष व संभाजी नगर येथील उच्च न्यायालय वकील संघटनेचे माजी अध्यक्ष अड्.अजित काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान त्यासाठी त्यांनी आज अन्य गणेश सहकारी कारखाना वाचवू इच्छित असललेल्या समविचारी कार्यकर्त्यांशी गाठीभेटी घेतल्या असल्याची खबर आहे. त्यासाठी त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या सभासदांकडून अपक्षा वाढल्या आहेत. मात्र ते माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात गटाशी यांच्या काँग्रेसशी व राष्ट्रवादीशी सहमती करणार की आपलीच अशोक सहकारी साखर कारखाण्यासारखी स्वतंत्र निवडणूक लढवणार हे लवकरच समजणार आहे.मात्र याबाबत ते स्वतंत्र निवडणूक लढवतील असा कयास व्यक्त होत आहे.कारण त्यांना नगर जिल्ह्यातील राजकारणापेक्षा शेतकरी हित जोपासणे व त्यांची संघटना वाढीवणे हे मोठे उद्दीष्ट असल्याचे समजते.

COMMENTS