Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संवत्सर शाळेला 15 लाखाचे पारितोषिक

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात गौरव

कोपरगाव तालुका ः  महाराष्ट्र राज्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने संपूर्ण राज्यभर राबविण्यात आलेल्या मु

काँग्रेस अनुसूचित जाती विभाग जिल्ह्यात सक्षम
टीईटी घोटाळ्यात नगर जिल्ह्यातील 149 शिक्षक
सत्ता नसतानाही शिवसेना-भाजपाने २०-२५ वर्षे एकत्र राहून काम केले…

कोपरगाव तालुका ः  महाराष्ट्र राज्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने संपूर्ण राज्यभर राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा ’ अभियानात कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने पुणे विभागीय स्तरावर दुसर्‍या क्रमांकाचे 15 लाखांचे पारितोषिक मिळविले आहे. मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मुंबई येथे हे पारितोषिक नुकतेच प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संकल्पनेनुसार 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत संपूर्ण राज्यभर मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान राबविले गेले. केंद्र, राज्य, विभागीय, जिल्हा व तालुका स्तरावरुन शाळांच्या कामगिरींचे मूल्यांकन करण्यात आले. शाळांची गुणवत्ता वाढावी, पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात हा मुख्य उद्देश समोर ठेऊन राविण्यात आलेल्या या अभियानात प्रत्यक्ष शाळेस भेटी देऊन परीक्षण करण्यात आले. पुणे विभागीय स्तरावर दुसर्‍या क्रमांकाचे पारितोषिक मिळविणार्‍या संवत्सर येथील जिल्हा परिषद शाळेत आजपर्यंत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. शाळेअंतर्गत सजावटीमध्ये बालवाचनालय, अभ्यासकीटस्, शैक्षणिक सभागृहात पर्यावरणपूरक आकर्षक चित्रे व त्यातून रेखाटलेली अहमदनगर जिल्हयाची वैशिष्टे, भिंतीवरील प्रेरणादायी सुविचार, संस्कारक्षम घोषवाक्ये, बोलकी चित्रे, थ्रीडी पेंटींग, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी पतसंस्था, पोस्ट ऑफीस, बालआनंद मेळावे, शाळेतील प्रवेश, क्षेत्र भेटी, सहली तसेच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इंटरअ‍ॅक्टीव्ह बोर्ड व प्राजेक्टरची सुविधा, शाळेचा 100 टक्के निकाल,  असे विविध उपक्रम राबविण्यात आलेले आहेत. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील यांचे मार्गदर्शन आणि जिल्हा परिषद शिक्षण समितीचे माजी सदस्य राजेश परजणे पाटील, गटशिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे व सक्रीय सहभागामुळे शाळेची झालेली शैक्षणिक प्रगती मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानातील मूल्यमापनात पात्र ठरली. मुख्याध्यापक फैय्याजखान पठाण व मुख्याध्यापक भागवतराव कर्पे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर वर्गाचे याकामी सहकार्य लाभले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह शिक्षक आमदार विक्रम काळे, आ. कपील पाटील, आ. राजेश पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, शिक्षण सचिव रणजितसिंग देवोल, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे हे पारितोषिक नुकतेच शाळेला प्रदान करण्यात आले.

COMMENTS