Homeताज्या बातम्यादेश

डॉक्टरांनी 7 वर्षांच्या मुलाच्या जखमेवर लावले फेविक्विक

तेलंगणामधून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. एका डॉक्टराने 7 वर्षांच्या मुलावर उपचार करताना जखमेवर चक्क फेवीक्विक लावल्याचा प्रकार स

बिभव कुमारला 5 दिवसांची पोलिस कोठडी
दुर्दैवी ! लोकलच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू I LOKNews24
चंद्रकांत पाटलांनी तात्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा

तेलंगणामधून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. एका डॉक्टराने 7 वर्षांच्या मुलावर उपचार करताना जखमेवर चक्क फेवीक्विक लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या मुलाच्या डोक्याला जखम झाली होती. पण, या डॉक्टराने जखमेवर फेव्हीक्विक लावले होते. या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील लिंगसुगर इथं राहणाऱ्या वामसी कृष्णा, त्यांची पत्नी सुनिता आणि त्यांचा मुलगा प्रवीण चौधरी यांच्यासह तेलंगणातील जोगुलांबा गडवाल जिल्ह्यातील एका लग्नासंभारभात आले होते. यावेळी खेळत असताना मुलाच्या डोक्याला दुखापत झाली. डाव्या डोळ्यावर कोच पडली होती. त्यामुळे त्याला तातडीने गावातील डॉक्टर नागार्जुन यांच्याकडे नेलं. पण, या डॉक्टराने जखमेवर टाके घालण्याऐवजी चक्क फेव्हीक्विक लावलं. जखमेवर फेवीक्विक लावल्यामुळे एकच प्रवीणने आरडाओरडा सुरू केला. वेदनेमुळे तो मोठ्याने रडू लागला. आपला मुलगा का रडत आहे, संतापलेल्या नातेवाईकांनी डॉक्टर नागार्जुनच्या रूममध्ये धाव घेतली आणि चांगलेच धारेवर धरलं. “तुम्ही खरोखरच एमबीबीएस डॉक्टर आहात का, डॉक्टर म्हणून तुम्हाला काही कळतं का? जखमेवर टाके टाकण्याऐवजी फेवीक्विक कसं लावलं. तुम्ही एमबीबीएस शिकत असताना हेच शिकलात का? अशी प्रश्नाची सरबत्तीच पालकांनी डॉक्टरावर केल लाथाबुक्क्यांनी तुडवलं

पालकांचा रौद्ररुप पाहून डॉक्टराची बोबडीच वळाली. आमच्याकडे वीज पुरवठा खंडीत झाला होता, त्यामुळे चुकून हे घडलं अशी सारवासारव डॉक्टरांनी केली. या प्रकरणी मुलाच्या आई-वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी डॉक्टराच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहे पाहण्यासाठी गेले असता डोक्यावर फेवीक्विक लावल्याचा प्रकार समोर आला.

COMMENTS