पाथर्डी प्रतिनिधी - अतिशय प्रतिकूल परिस्थिती मध्ये संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना प्रताप ढाकणे यांनी उभा केलेला महारा
पाथर्डी प्रतिनिधी – अतिशय प्रतिकूल परिस्थिती मध्ये संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना प्रताप ढाकणे यांनी उभा केलेला महाराष्ट्राने पाहिला आहे.हा आदर्श न घेता तुम्ही आम्हाला सहकार शिकवता,तुम्ही काय दिवे लावले? तुमच्या कारखान्याची परिस्थिती काय आहे.काटा मारण्याचे बंद करा आमच्या कारखान्यावर जर गाडीच्या टनात फरक आला तर राजकारणाचा राजीनामा देण्याची ग्वाही देतो.हे धाडस तुमच्यात आहे का? कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा जगदंबा महाविकास आघाडीचा प्रचाराचा शुभारंभाप्रसंगी संस्कार भवन येथे पाथर्डी शेवगाव मतदार संघाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले बोलत होते.
यावेळी राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे, मा.आ. चंद्रशेखर घुले,प्रताप काका ढाकणे,शिवशंकर राजळे, भगवानराव दराडे,रफिक शेख,बंडू बोरुडे,एलियास शेख,नवनाथ राठोड,विष्णुपंत ढाकणे,भोरू म्हस्के,गहिनीनाथ शिरसाठ,सीताराम बोरुडे,राजेंद्र खेडकर,प्रकाश शेलार,सविता भापकर आणि सर्व उमेदवार व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना घुले यांनी म्हटले की,लोकप्रतिनिधींनी सात वर्षात मतदारसंघात एक भरीव काम केले असेल तर सांगावं.आम्ही विकास काम करायला लागलो तर आमच्या पंचायती करता तुम्हाला कुठून डिझेल येते,टक्केवारी येते हे आम्हाला माहिती नाही का.गेल्या सात वर्षात तुमचं सरकार असताना सरकाराच्या योजनेअंतर्गत शेतीमालाच्या हितासाठी निर्णय का घेतले नाही.लोकांना झुलत ठेवत विकासाचे काम न करता भुलभुलया करायचे काम लोकप्रतिनिधीं करतात.आमच्या काळात पारदर्शक कारभार करत पाच भूखंड दिले तर प्रश्न उपस्थित करता तुमच्या काळात ६५ पैकी ६० भूखंडाचे श्रीखंड तुम्ही खाल्ले,ते भूखंड कोणाला दिले पुढच्या बैठकीत पत्रकारांना यादी देत जाहीर करणार आहोत.तुमच्यासाठी पाण्याची योजना,शेतकऱ्यांच्या मोटरीसाठी सबस्टेशन आणि दळणवळणासाठी काही न करणाऱ्याना कशासाठी निवडून द्याचं हा विचार करा,कुठल्याही भुलथापाना बळी न पडता आपले प्रश्न सोडवण्यासाठी जगदंबा महविकास आघाडीच्या उमेदवारांना साथ द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अँड.प्रतापराव ढाकणे विरोधक आम्हाला सहकारी संस्था चालवता येत नाहीत अशी टीका करतात पण आमच्या ताब्यात दोनच संस्था आहेत,त्यात १४ लाख रुपये तोट्यात असणारी बाजार समिती आम्ही पाच वर्षात सव्वा दोन कोटीची कामे करत ५५ लाख रुपये नफ्यात आणली.अनेक अडचणीवर मात करत केदारेश्वर कारखान्यावर ३२ कोटी कर्ज असून वृद्धेश्वर कारखान्यावर आमच्यापेक्षा जास्त कर्ज आहे.तुमच्या ताब्यात असलेला दुग्ध संघ भाडेतत्वावर चालवायला देता विरोधकांनी संपवलेली बाजार समिती आम्ही जिवंत केली मग त्यांनीच सांगावे आम्हाला सहकारी संस्था चालवता येत नाहीत का?
यांच्या ताब्यात असलेल्या खरेदी विक्री संघ,दूधसंस्था,पालिका यांची काय अवस्था आहे.विरोधक भावनात्मक राजकारण करत असून खोटा इतिहास जनतेसमोर ठेवून तालुक्याला दिशा देणाऱ्याचा इतिहास पुसण्याचे काम करत आहेत.यांच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वाराला अतिक्रमण केले असून त्याचे उदघाटन करून संरक्षण देण्याचे काम त्यांनी केले.मागील पाच वर्षात कोरोना सारख्या महामारीत उत्पन्न कमी झाले असताना ही बाजार समितीमध्ये भरीव कामे केली आहेत.येणाऱ्या काळात तिसगाव,खरवंडी,मिरी येथील उपबाजार समिती सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करायचे आहे.
COMMENTS