Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमच्या सांघिक कामामुळे विरोधकांना माणसे गोळा करणे जड जात आहे ;- डॉ.सुजय विखे

पाथर्डी प्रतिनिधी - आमच्या सांघीक कामामुळे विरोधकांना माणसे गोळा करणे जड जात असून जाहीरनाम्यातील विरोधकांवरील आरोप पाहता ही निवडणूक एकतर्फी होईल

देशाला मोदींशिवाय पर्याय नाही ः खा. डॉ. सुजय विखे
सुशासन आणि विकासाचे पर्व म्हणजे मोदी सरकारची 10 वर्षे
विकास थांबवणारा तुमचा लोकप्रतिनिधी होऊ शकत नाही ः डॉ. सुजय विखे

पाथर्डी प्रतिनिधी – आमच्या सांघीक कामामुळे विरोधकांना माणसे गोळा करणे जड जात असून जाहीरनाम्यातील विरोधकांवरील आरोप पाहता ही निवडणूक एकतर्फी होईल याची खात्री आहे.पहिल्या विजयी सभेला आपण आवर्जून येऊन आमदार राजळे यांच्या नेतृत्वगुणावर प्रकाश टाकू.भाजपची सर्वत्र सत्ता असल्याने विकास कामांचा वेग वाढला आहे याची जाणीव कार्यकर्त्यांनी लोकांना करून द्यावी.बाजार समिती निवडणुकीसाठी भाजप व अन्य मित्र पक्षांचे आदिनाथ शेतकरी मंडळाचा श्री क्षेत्र वृद्धेश्वर येथे प्रचाराचा प्रारंभ करत मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले.त्यावेळी खासदार डॉ.सुजय विखे बोलत होते.

          यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड ,ज्येष्ठ नेते काशिनाथ लवांडे व उद्धव वाघ, सरपंच गणेश पालवे माजी सभापती अर्जुन शिरसाट ,भीमराव फुंदे ,अशोक चोरमले, माणिक खेडकर,गोकुळ दौड,काशिनाथ लवांडे तसेच सर्व उमेदवारासह तालुक्यातील समर्थक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पुढे बोलताना विखे यांनी म्हटले की,आमदार मोनिका राजळे यांनी बाजार समिती निवडणुकीसाठी सर्वांना विश्वासात घेत अत्यंत उत्कृष्ट पॅनल दिले असून या मजबूत पॅनलमुळे त्यांच्या नेतृत्वाखालील बाजार समितीमध्ये सत्ता मिळून स्वर्गीय राजीव राजळे यांचे विकासाचे स्वप्न साकार करण्याची हीच वेळ आहे. बाजार समितीमध्ये भाजप प्रणित आदिनाथ मंडळाची सत्ता येणार असून आमदार मोनिका राजळे यांचे कठोर परिश्रम व नव्या जुन्या चेहऱ्यांना संधी देण्याचे धोरण कारणीभूत ठरणार आहे .कोरोना कालावधीत निवडणुका झाल्या नाहीत. न्यायप्रविष्ठ प्रकरणांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील याची शाश्वती नाही. त्यामुळे आमच्या कारकिर्दीतील पहिलीच निवडणूक म्हणून बाजार समितीची निवडणूक होत आहे.पक्षात अनेक येतील ,जातील त्याकडे लक्ष न देता एका दिल्याने काम करा. आगामी काळात प्रत्येक निवडणूक तेवढ्याच ताकतीने लढवायची आहे.

          यावेळी बोलताना आमदार मोनिका राजळे म्हणाल्या संभ्रम निर्माण करण्याचे काम करून नफा मिळाल्याची खोटी माहिती दिली जाते.डिपॉझिट व भाडेवाढ नफ्यामध्ये तुम्ही गृहीत धरत असाल तर तुमचा ताळेबंद तपासण्याची वेळ आली आहे.सात वर्षात काय काम केले यावर प्रत्येकाची नजर होती. भूखंड वाटले ,तुर खरेदी घोटाळा व इतर चौकशीचे काम अंतिम टप्प्यात आल्यावर सरकार बदलले गेले, तुम्ही त्याची तुम्ही चौकशी दाबली.संचालक व कर्मचाऱ्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला.बाजार समितीची प्रचंड दुरावस्था होऊन कोणत्याही सोयी सुविधा नाहीत.अशा लोकांच्या हाती सत्ता द्यावी का याचा विचार मतदारांनी करावा असे राजळे म्हणाल्या. 

         माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी भाषणातून भाजपला विजयी करण्याचे आवाहन करत घाटशिरस येथे जिल्हा बँकेची शाखा सुरू करण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभय आव्हाड सूत्रसंचालन राजू सुरवसे तर आभार डॉक्टर मृत्युंजय गर्जे यांनी मानले.

COMMENTS