Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जीवनात गुरुचे स्थान सर्वात महत्वाचे आहे – कवी माने

लातूर प्रतिनिधी - तरुणांनी अभ्यासाकडे लक्ष देऊन जीवनातील ध्येयपूर्ती साकारावी. गुरु, शेती-माती, नाती-गोती, आजोबा आणि नातू आई, वडील, प्रेम या आशया

उत्कृष्ट तार मार्ग कर्मचारी म्हणून अरविंद सावते सन्मानीत
आपली पेन्शन आपल्या दारी मोहिमेला प्रथम पुरस्कार
देशाचा पिंड सर्वधर्मसमभावाचा आहे ते संपवू शकणार नाही-प्रणिती शिंदे 

लातूर प्रतिनिधी – तरुणांनी अभ्यासाकडे लक्ष देऊन जीवनातील ध्येयपूर्ती साकारावी. गुरु, शेती-माती, नाती-गोती, आजोबा आणि नातू आई, वडील, प्रेम या आशया वर आधारित विविध कविता त्यांनी सादर करून सर्वच श्रोत्यांची माने जिंकली. जीवनात गुरुचे स्थान सर्वात महत्वाचे आहे. गुरु बद्दलची महती लातूरचे सुप्रसिद्ध कवी माने यांनी तरुण पिढीला उत्कृष्ट रित्या कवितेतून सादर केली.
दयानंद कॉलेज ऑफ फार्मसी व दयानंद इंस्टीट्यूट ऑफ फार्मसी यांचे दि. 19 व 20 एप्रिल रोजी झील 2023 हे संयुक्त वार्षिक स्रेहसंमेलनाच्या उद्घाटनर प्रसंगी कवी योगिराज माने हे बोलत होते. या प्रसंगी प्राचार्या डॉ. क्रांती सातपुते, प्राचार्य डॉ. वाजीद चाऊस, शैक्षणिक विभाग प्रमुख डॉ.समीप सोनवणे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. गोपाल लोहिया, प्रा. अरुण कोंडापुरे, प्रा. अविनाश चौधरी, विद्यार्थी प्रतिनिधी दीपक शिंदे, काळे पूजा, कैलास सूर्यवंशी,जाधव गणेश,रितेश सूर्यवंशी, अभिषेक पितळे, मधुरा शेळके यांची उपस्थिती होती. या प्रसंगी महाविद्यालयातील विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा सुवर्ण पदक, स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. क्रांती सातपुते यांनी केले. स्रेहसंमेलना निमित्त दोन्ही महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी पन्नासहून अधिक विविध नृत्य, नाटिका, गायन, विनोद असे कलाविष्कार आणि शेलापागोटे उत्स्फूर्तपणे सादर केले. या प्रसंगी विविध स्पर्धेतील व क्रीडा प्रकारातील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. या स्रेहसंमेलनास दोन्ही महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी व प्राध्यापक उपस्थित होते.

COMMENTS