Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीडीओंच्या संपामुळे रोहयोची कामे ठप्प

लातूर प्रतिनिधी - रोहयोची कामे करण्यास गटविकास अधिकारी यांना आडचणी येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित संघटनेच्यावतीने गटविकास अधि

स्वाभिमानीचे एकला चलो रे
कंटेनरला ओव्हरटेक करताना धक्का लागून दोघे चिरडले
वाई बाजार येथे रामनवमी निमित्य खा.हेमंत पाटील यांचे आगमन

लातूर प्रतिनिधी – रोहयोची कामे करण्यास गटविकास अधिकारी यांना आडचणी येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित संघटनेच्यावतीने गटविकास अधिकारी यांनी विविध मागण्याच्या संदर्भाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेशी संबंधित सर्व कामे करण्यास नकार देत असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. गटविकास अधिकारी यांच्या मागण्याच्या संपामुळे रोहयोची कामे दि. 11 एप्रिल पासून ठप्प झाली आहेत.
मजुरांच्या उपस्थिती बाबत गट विकास अधिकारी हे जबाबदार राहणार नाहीत, याबाबत शासन निर्णय निर्गमित करावा. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने बाबतीत ग्रामपंचायत स्तरावरील यंत्रणांची जबाबदारी निश्चित करणे. राज्यस्तरावरून मंजूर करण्यात येत असलेल्या कामांच्या बाबतीत, मंजुरी बाबत व 60:40 चे प्रमाण राखण्याबाबत गट विकास अधिकारी जबाबदार राहणार नसल्याबाबत शासन निर्णय निर्गमित करणे या मुद्यांबाबतीत संघटनेच्या बैठकांदरम्यान अतिशय सकारात्मक चर्चा झालेली होती. तसेच शासनर स्तरावरून लवकरच या बाबतीत योग्य ते शासन निर्णय निर्गमित करण्यात येतील असे संघटनेला आश्वासित केलेले होते. मात्र या बाबतीत अद्याप पर्यंत कोणताही निर्णय शासन स्तरावरून घेण्यात आलेला नसल्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील मविसे च्या अधिका-यांमध्ये निराशेची आणि भीतीची भावना पसरलेली आहे. मविसे या संघटनेने नाईलाजास्तव दि. 11 एप्रिल पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेशी संबंधित सर्व कामे करण्यास नम्रपने नकार देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी व कामे करणे, ऑनलाईन व ऑफलाईन बैठका, आढावा देणे व माहिती सादर करणे इत्यादी सर्व कामे ठप्प झाली आहेत. या निवेदनावर उपमुख्यकार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, गटविकास अधिकारी तुकामराम भालके, अमोल ताकभाते, युवराज म्हेत्रे, किरण कोळपे, वैजनाथ लोखंडे, सोपान अकेले, बी. टी. चव्हाण आदींच्या स्वाक्ष-या आहेत. लातूर जिल्हयात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सिंचन विहिर, सार्वजनिक विहिर, घरकूल, वृक्षलागवड व संगोपन, रस्ता, शेततळे, जनावरांचा गोठा, आमृत सरोवर, ग्रामपंचायत भवन बांधकाम, रेनवॉटर हार्वस्टींग, अंगणवाडी बांधकाम अशी 1 हजार 398 कामे जिल्हयात गेल्या आठवडयात सुरू होती. याकामावर 1 लाख 4 हजार 469 मजूर राबत होते. मात्र गटविकास अधिकारी यांचे विविध मागण्यासाठी रोहयोची कामे न करण्यासाठी संप सुरू झाल्याने ही सर्व कामे ठप्प झाली आहेत. हाताला काम नसल्यामुळे मजूरावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे.

COMMENTS