Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डीत लाखो भाविकांची मांदियाली

शिर्डी/प्रतिनिधी ः शिर्डी येथे श्रीराम नवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी मोठ्या संख्येने साईभक्त दाखल झाले असून लाखो साई भक्तांनी साई समाधीचे दर्शन घेत

मनपाचे वसुली कर्मचारी घेतात हप्ता ; सत्ताधारी नगरसेवकाचा महासभेत जाहीर आरोप
मनपा करणार एका प्रभागात मीटरद्वारे पाणीपुरवठा ; यंदाचे अंदाजपत्रक 802 कोटींचे, नवी करवाढ नाही
मनसेला भोंगाविरोधी भूमिकेमुळे गळती

शिर्डी/प्रतिनिधी ः शिर्डी येथे श्रीराम नवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी मोठ्या संख्येने साईभक्त दाखल झाले असून लाखो साई भक्तांनी साई समाधीचे दर्शन घेतली असून भक्तांच्या गर्दीमुळे शिर्डीतील हॉटेल, लॉजिंग व भक्तनिवास हाउसफुल झाले आहे. श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी गुरुवार 30  मार्च रोजी अखंड पारायण समाप्तीनंतर श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची व्दारकामाईतून गुरुस्थानमार्गे सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीत संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी पोथी, तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी वीणा, वैद्यकीय संचालक ले.कर्नल डॉ.शैलेश ओक व संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी यांनी श्रींची प्रतिमा घेवुन मिरवणूकीत सहभाग घेतला. याप्रसंगी संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, सौ.मालती यार्लगड्डा, सौ.मिनाक्षी सालीमठ,  मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, साईभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते.श्री रामनवमी उत्सवाच्या निमित्त अनेक  ग्रामस्थ कोपरगाव येथून गोदावरी नदी पात्रातून गंगाजल घेऊन येतात त्या गंगाजल आणणार्‍या कावडीचें पुजन संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व त्यांची सुविद्य पत्नी सौ.मालती यार्लगड्डा, तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.मिनाक्षी सालीमठ आणि प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी केले.
श्री साई समाधी मंदिरात श्रींची विधीवत पाद्यपुजा  संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व त्यांची सुविद्य पत्नी मालती यार्लगड्डा. यावेळी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना.दिपक केसरकर, संस्थानचे तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, सौ.मिनाक्षी सालीमठ यांनी केली. यावेळी संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी आदी उपस्थित होते.तसेच श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी व्दारकामाई मंदिरातील दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गव्हाच्या पोत्याची पुजा  संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व त्यांची सुविद्य पत्नी मालती यार्लगड्डा आणि तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व त्यांची सुविद्य पत्नी मिनाक्षी सालीमठ यांनी केली. दरम्यान शिर्डीमध्ये सर्व पालख्या व हजारो साईपदयात्री तसेच विविध वाहनांमधून साईभक्त शिर्डीत दाखल झाले आहेत. शिर्डी साईभक्तांनी व साई नामाने दुमदुमून गेली आहे. संस्थान सुरक्षा विभाग व पोलिसांनी ही चौख बंदोबस्त ठेवला आहे. पायी शिर्डीला येणार्‍या साई पदयात्रांसाठी रस्त्यामध्ये ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, चहा नाश्ता, फळे, सरबत, मोफत वाटण्यात येत आहेत.

COMMENTS