Homeताज्या बातम्यामनोरंजन

एलन मस्क जोमात, बॉलिवूड कोमात; दिग्गज कलाकारांचे ब्लू टिक गायब

मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने  लेगसी व्हेरिफाईड अकाऊंटवरुन ब्लू टिक काढून टाकली आहे. म्हणजे असे हॅण्डल ज्यांना ट्विटरची सशुल्क सेवा न घेता ब्लू ट

महावितरणच्या अथक प्रयत्नांना यश; कृषिपंपांना 8 तास सुरळीत वीजपुरवठा
तब्बल 30 हजार सिम कार्डस केले बंद
वाचकांकडून वृत्तपत्र विक्रेत्याचा सन्मान

मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने  लेगसी व्हेरिफाईड अकाऊंटवरुन ब्लू टिक काढून टाकली आहे. म्हणजे असे हॅण्डल ज्यांना ट्विटरची सशुल्क सेवा न घेता ब्लू टिक मिळाले होते. त्या अकाऊंटवरुन आता ब्लू टिक हटवण्यात आली आहे. यामध्ये अभिनेते, खेळाडू, राजकारणी यांचा समावेश आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार ते क्रिकेटपटू विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी आणि भारतीय राजकारणातील मोठी नावे जसं की महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ब्लू टिक हटवण्यात आली आहे. खरंतर, ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी 12 एप्रिललाच घोषणा केली होती की 20 एप्रिलपासून सर्व लेगसी व्हेरिफाईड अकाऊंटचे ब्लू टिक काढून टाकले जातील. आता फक्त अशा लोकांनाच ही सुविधा मिळणार आहे, जे ब्लू टिकसाठी पैसे खर्च करुन मासिक योजना घेतील. यानंतर, 20 एप्रिलच्या रात्री 12 वाजता, अशा सर्व अकाऊंटचे ब्लू टिक काढून टाकण्यात आले. यापूर्वी, ट्विटर राजकारणी, अभिनेते, पत्रकारांसह सेलिब्रिटींच्या अकाऊंटला ब्लू टिक देत असे. यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नव्हते, मात्र इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर कंपनीने अनेक मोठे बदल केले आहेत. यातील बदल म्हणजे ब्लू टिक पेड सर्विस अर्थात सशुल्क सेवा. ज्यांना ब्लू टिक आहे त्यांना त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. सुरुवातीला ही सेवा यूएस, यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर आता याची भारतातही सुरुवात झाली आहे. या अंतर्गत, या सेवेसाठी पैसे देणाऱ्यांनाच त्यांच्या अकाऊंटवर ब्लू टिक मिळू शकते.

COMMENTS