Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समृद्धीवरील अपघातात माजी रणजीपटूचा अपघात

पत्नीचा मृत्यू ः प्रवीण हिंगणीकरण गंभीर जखमी

नागपूर : मृत्यूचा सापळा बनलेल्या समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात माजी रणजीपटू प्रवीण हिंगणीकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पत्नीचा घट

भीषण अपघातात माय-लेकाचा जागीच मृत्यू
जम्मू-कश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात भीषण अपघात
समृद्धीवरील अपघातात दोन डॉक्टरासह 3 जणांचा मृत्यू

नागपूर : मृत्यूचा सापळा बनलेल्या समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात माजी रणजीपटू प्रवीण हिंगणीकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
प्रवीण हिंगणीकर आपल्या पत्नीसह क्रेटा कारने पुण्याहून नागपूरच्या दिशेने निघाले होते. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर नजीक समृद्धी महामार्गावरून जाताना रस्त्यात एक आयशर उभा होता. यावेळी वेगात असलेले कार आयशरला धडकून हा अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या अपघातात प्रवीण हिंगणीकर जखमी झाले तर त्यांची पत्नी जागीच दगावली. अपघात एवढा भीषण होता की वाहनाचा अक्षरशा, चुराडा झाला आहे. प्रवीण हिंगणीकर यांना प्रारंभी मेहकर ग्रामीण रुग्णालय व नंतर खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांच्या हाता पायाला जखमा असून ते सुखरुप आहेत.

COMMENTS