Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कासारी येथे शिंगेसन माता यात्रा उत्सव

केज प्रतिनिधी - केज तालुक्यातील कासारी येथील सिंगेसन माता यात्रा उत्सवाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात केले आहे. गावातील पाटी

Kopardi Rape And Murder Case : कोपर्डी अत्याचार व खून प्रकरणाची सुनावणी तहकूब
किरीट सोमय्यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता | DAINIK LOKMNTHAN
बीडमध्ये तीन बालकांचा मृत्यू, आईची मृत्यूशी झुंज | LokNews24

केज प्रतिनिधी – केज तालुक्यातील कासारी येथील सिंगेसन माता यात्रा उत्सवाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात केले आहे. गावातील पाटील यांच्या दारातून देवीच्या पालखीचा छबिना निघतो गावातून पालखी मिरवणूक निघत मुख्य रस्त्याने देवीच्या ठिकाणी दुपारी 1 वाजता जाते  कासारी येथील सिंगेसन माता यात्रा उत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यानिमित्ताने कासारी ग्रामस्थांच्या बतीने यात्रेची पूर्ण तयारी केली आहे तरीपण कासारी ग्रामस्थांच्या बतीने यात्रेसाठी येणार्‍या भावी भक्तांना आव्हान केले आहे की उन्हाळा सुरू आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या सोबत पाण्याची बाटली डोक्याला ऊन लागणार नाही त्यासाठी एखादा गमजा, छत्री याचा प्रत्येकाने वापर करावा जेणेकरून कोणाला ही ऊनाची तीव्रता जाणवणार नाही. धारूर केज सह मैंदवाडी, धर्माळा, तरनळी, कानडी तांबवा. कोल्हेवस्ती नागझरी, जिवाचीवाडी, कासारी गावातील लोक भाविक भक्त यात्रेसाठी येत असतात. दुपारी एक च्या दरम्यान देवीच्या मंदिरात मोठी गर्दी होत असते त्यामुळे लहान मुलांची व्यवस्थित काळजी घेत भाविक भक्तांनी व्यवस्थित देवीचे दर्शन घ्यावे असे आव्हान. कासारी गावचे युवा सरपंच अमोल लक्ष्मणराव डोईफोडे, पत्रकार ज्ञानोबा वायवसे, उपसरपंच आप्पा वायबसे, जयदेव वायबसे अण्णासाहेब वायबसे, रणजीत डोईफोडे, दादासाहेब डोईफोडे, प्रतिष्ठित नागरिक सुखदेव अण्णा वायबसे, उत्तम सिताराम डोईफोडे, गोरख रामराव वायबसे, यांनी केले आहे.

COMMENTS