Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशाच्या राजकारणात भारतीय जनता  पार्टीमुळे अमुलाग्र परिवर्तन-राजेंद्र मस्के

बीड प्रतिनिधी - भारतीय जनता पार्टी जगातील सर्वात मोठा पक्ष. निष्टावंत कार्यकर्ते आणि समर्पण भावनेतून काम करणारे नेते मंडळींच्या अथक परिश्रमातून

विषाणू काळातील अमानवीयता !
सर्वोदय विद्यालयाचे तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धांत नेत्रदीपक यश
नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांची उद्या प्रकट मुलाखत

बीड प्रतिनिधी – भारतीय जनता पार्टी जगातील सर्वात मोठा पक्ष. निष्टावंत कार्यकर्ते आणि समर्पण भावनेतून काम करणारे नेते मंडळींच्या अथक परिश्रमातून भारतीय जनता पार्टीची संघर्षातून चालू झालेली वाटचाल आज  यशाच्या शिखराकडे चालू आहे. अनेक चढ उतार सहन करत पक्षाने उभारी घेतली. कणखर आणि मुत्सदी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात सत्ता स्थापन करुन लोकहिताचे काम सुरु केले. साठ वर्षाची भ्रष्टाचाराची परंपरा नष्ट करण्यासाठी पारदर्शक कारभार सुरु केला. 370 कलम, अयोध्या राम मंदिर, या सारख्या ऐतिहासिक निर्णय घेतले. व्यक्तिकेंद्रित राजकारण न करता राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन स्वतंत्र विचारधारा पक्षाने जनतेला दिली. विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात भारत सरकार गतिमान असून शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगोत्री नेण्याचे काम पक्ष करत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देशाच्या राजकारणात भारतीय जनता पार्टीने अमुलाग्र परिवर्तनासाठी प्रभावी भूमिका निभावली. अशा कीर्तिमान अन जनकल्याणकारी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असणे ही स्वाभिमानाची बाब आहे. असे विचार भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी भाजपा वर्धापन दिनी मांडले.
आज भारतीय जनता पार्टीचा 43 वा वर्धापन दिन संघर्षयोद्धा भाजपा जनसंपर्क कार्यालय बीड येथे भाजपाचे जेष्ठ नेते आमदार सुरेश आण्णा धस,भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, सर्जेराव तांदळे, नवनाथ शिराळे, प्रा. देविदास नागरगोजे, जगदीश भैय्या गुरखुदे, बालाजी पवार, किरण बांगर कपिल सौदा, नागेश पवार, विलास बामणे,  यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. डॉ.शामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करून, आमदार सुरेश अण्णा धस यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीचा ध्वज फडकवण्यात आला. तसेच  माजी आमदार आदिनाथ नवले पाटील, विजयकुमार पालसिंगनकर, बालकिसन सिकची काका,  गजानन जगताप, दत्ताजी नलावडे भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते व  कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सोमनाथराव माने, रवींद्र गंगावणे, हरीश खाडे, शिवाजी जाधव, विष्णू म. सुरवसे, बापू जाधव, गजानन फाटे, नाना शिंदे, वसंत गुंदेकर, सुरेश माने, गणेश वाणी, लक्ष्मण थोरात, तुकाराम गायकवाड, बाबुराव परळकर,  शरद झोडगे, भूषण पवार, राजेश गवळी, नरेश पवार, गणेश लांडे, संभाजी सुर्वे, किरण देशपांडे, प्रमोद रामदासी, मानव जोशी, प्रवीण वझे, बाळासाहेब सौंदतीकर, ज्ञानेश्वर आंधळे, भागवत खाकरे, विठ्ठल ढोकणे, लालासाहेब पन्हाळे, राहुल साळुंके, नितीन आमटे,विठ्ठल ठोकळ, शरद घोलप, रवी कळसाने, गणेश सांगूळे, कल्याण पवार, बद्रीनाथ जटाळ, गणेश तोडेकर, अनिल शेळके, सचिन अगाम, बाळासाहेब गात, पंकज धांडे, समर्थ तांदळे, गणेश शेंडगे, कैलास भोसले, राम येवले महेश सावंत, अजय सावंत, अक्षय बजगुडे, लक्ष्मण भिंगले, मनीष भिंगले, दत्ता सावंत,पुरुषोत्तम कासारे, उतरेश्वर मंडलिक सुनील अवचार, रामभाऊ बांड यांच्यासह बहुसंखेने कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS