Homeताज्या बातम्यादेश

9  वर्षीय इन्स्टा क्वीनची आत्महत्या

तामिळनाडू प्रतिनिधी - तामिळनाडूतील पेरियाकुप्पम येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तमिळनाडूमधील एका 9 वर्षीय मुलीने किरकोळ कारणावरून आत्म

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या
वडवणी येथील अल्पभूधारक शेतकर्‍याची आत्महत्या
भाजप नेत्याच्या मुलीची आत्महत्या

तामिळनाडू प्रतिनिधी – तामिळनाडूतील पेरियाकुप्पम येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तमिळनाडूमधील एका 9 वर्षीय मुलीने किरकोळ कारणावरून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रतीक्षा असे या मुलीचे नाव असून तिचे वडिल कृष्णमृर्ती यांनी तिला अभ्यास कर सांगितल्यावर असे धोकादायक पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. ही मुलगी इंस्टा क्विन म्हमूनही ओळखली जात असल्याचेही सांगण्यात आले आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की, घटनेच्या दिवशी ही मुलगी आपल्या आजीच्या घरापाशी खेळत होती. यावेळी तिच्या वडिलांनी तिला ओरडून घरी जावून अभ्यास करण्यास सांगितले. तसेच घराची चावीहीदिली. यानंतर ते आपल्या बाईकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी बाहेर गेले. रात्री ८.१५ च्या सुमारास ते घरी परतले असता त्यांना घर आतून बंद असल्याचं समजलं. यानंतर त्यांनी आपल्या मुलीला दरवाजा उघडण्यास सांगितला. मात्र आतमधून कोणताही आवाज आला नाही. मुलीने कोणताही प्रतिसाद न दिल्याने ते घाबरले आणि त्यांनी खिडकी तोडून आतमध्ये प्रवेश केला असता त्यांची मुलगी गळ्यात टॉवेल लटकवलेल्या अवस्थेत दिसली आणि ती रडत होती. यानंतर तिला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले मात्र दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे

COMMENTS