Homeताज्या बातम्यामनोरंजन

माधुरीबद्दल ‘आक्षेपार्ह शब्द’ वापरणं नेटफ्लिक्सला भोवलं

मुंबई प्रतिनिधी - ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या नेटफ्लिक्सवर विविध प्रकारांचे शो दाखवले जातात, ज्यांची लोकप्रियता खूप जास्त आहे. असाच एक शो म्हणजे

समूह शाळा योजनेला राज्यातून नकारची घंटा
गेल्या 8 वर्षांपासून आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये भर : केंद्रीय मंत्री सिंधिया
पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन

मुंबई प्रतिनिधी – ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या नेटफ्लिक्सवर विविध प्रकारांचे शो दाखवले जातात, ज्यांची लोकप्रियता खूप जास्त आहे. असाच एक शो म्हणजे ‘द बिग बँग थिअरी’. या शोचे प्रचंड मोठे फॅनफॉलोविंग आहे.. अलीकडेच हा शो पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे, पण यामागचे कारण म्हणजे कोणताही सीन आवडणे नसून शोमध्ये दाखवण्यात आलेला माधुरी दीक्षितचा अपमान हे आहे.यावरून आता चांगलाच वाद सुरु झाला आहे. माधुरीच्या अपमानाखातर नेटफ्लिक्सला थेट लीगल नोटीस पाठवण्यात आली आहे. लेखक आणि राजकीय विश्लेषक मिथुन विजय कुमार यांनी नेटफ्लिक्सला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. पाठवलेल्या या नोटीसमध्ये कुमारने म्हटले आहे की, तो एपिसोड काढून टाकण्यात यावा, ज्यामध्ये माधुरी दीक्षितचा अपमान करण्यात आला आहे. त्यांनी त्या भागाचे वर्णन अपमानास्पद आणि कलंकास्पद असे केले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण -‘बिग बँग थिअरी’ या शोचा दुसरा सीझन सुरू झाला आहे. त्याच्या पहिल्याच भागात माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय यांची चुकीची तुलना केली आहे. ज्यामुळे आता मोठा वाद निर्माण होऊ शकतो. तुलनेदरम्यान वापरण्यात आलेल्या शब्दांवर अनेकांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे. जिम पार्सन्सने ऐश्वर्या रायला ‘गरीब माणसाची माधुरी दीक्षित’ म्हटले आहे. प्रत्युत्तरादाखल, कुणाल नायर म्हणतो की ऐश्वर्या राय ही देवीसारखी आहे आणि तिच्या तुलनेत माधुरी दीक्षित ही गरिबांची प्रॉस्टिट्युट आहे. ज्येष्ठ अभिनेत्री माधुरी दीक्षितबद्दल असे शब्द ऐकल्यानंतर मिथुन विजय कुमारने नेटफ्लिक्सला नोटीस बजावली आहे.

COMMENTS