Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पद्मकांत कुदळे व शिलाताई कुदळे यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान

कोपरगाव प्रतिनिधी ःशिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे प्रतिष्ठान व रेनबो इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.ग.वि. तथा लहानुभाऊ (अण्णा) नागरे

पवार साहेबांच्या मदतीने मतदार संघाचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सुटणार :आमदार आशुतोष काळे
gevrai : पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत आमदार लक्ष्मण पवार यांच्या हस्ते मोफत धान्य वाटप l LokNews24
अंगावर स्लॅब कोसळून कामगार गंभीर जखमी

कोपरगाव प्रतिनिधी ःशिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे प्रतिष्ठान व रेनबो इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.ग.वि. तथा लहानुभाऊ (अण्णा) नागरे यांच्या 85 व्या जयंती महोत्सवानिमित्त दि.27 मार्च रोजी साईसुष्टी लॉन्स येथे आयोजित केलेल्या क्रार्यक्रमात  काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात  यांच्या हस्ते कोपरगांवचे माजी नगराध्यक्ष  पद्मकांत कुदळे व सौ. शिलाताई कुदळे यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
आ.बाळासाहेब थोरात यांनी पुरस्कारार्थींचे अभिनंदन करत  स्व. लहानुभाऊंच्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी कांतीलाल अग्रवाल,  मनोज अग्रवाल, संजय नागरे, वाणिताताई नागरे, आकाश नागरे, आनंद दगडे, तुषार पोटे, सुभाष सांगळे आदिंसह मान्यवर उपस्थित होते. पदमाकांत कुदळे हे राज्यातील अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्थेवर मुख्य पदावर कार्यरत असून त्यात अखिल भारतीय माळी शैक्षणिक संस्था पुणे च्या मुख्य विश्‍वस्त पदी, एस,एस,जी. एम महाविद्यालय कोपरगाव स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य, के.बी.पी विद्यालय कोपरगाव स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य व अध्यक्ष, आशिया खंडातील अग्रगण्य रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य, कोपरगाव माळी बोर्डिंगचे विश्‍वस्त, कोपरगाव बागायतदार सोसायटीचे अध्यक्ष, कोपरगाव तालुक्यातील अग्रगण्य धनश्री महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेत देखील त्यांचा मोलाचा वाटा असून त्यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देखील अतिशय उत्कृष्टपणे सांभाळली असून ते गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील तळागाळातील गोरगरीब, विद्यार्थी, कष्टकरी, शेतकरी आदी समाजातील प्रत्येक घटकांच्या प्रश्‍नासाठी लढत असून त्यांच्या या अद्वितीय कार्याची दखल घेऊन त्यांना शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे प्रतिष्ठाण व रेन्बो इंटरनशनल स्कुलच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याने नक्कीच कोपरगावकरांसाठी ही अभिमानास्पद बाब असून यामुळे पदमाकांत कुदळे यांच्या रूपाने कोपरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

COMMENTS