Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खोपडीतील शेतकर्‍यांना 18 वर्षांनंतर मिळाला जमिनीचा मोबदला  

कोपरगाव प्रतिनिधी ः नांदूर मधमेश्‍वर जलद कालव्याच्या वितरिकेसाठी जमिनी दिलेल्या कोपरगाव तालुक्यातील खोपडी येथील 17 शेतकर्‍यांना अखेर 18 वर्षांनंत

अपूर्वा रोकडेची ज्युनियर कराटे स्पर्धेत चमकदार कामगिरी
निळवंडे उपकालव्यांचे काम सुरू करून बंधारे भरून द्या
पवार साहेबांच्या मदतीने मतदार संघाचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सुटणार :आमदार आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी ः नांदूर मधमेश्‍वर जलद कालव्याच्या वितरिकेसाठी जमिनी दिलेल्या कोपरगाव तालुक्यातील खोपडी येथील 17 शेतकर्‍यांना अखेर 18 वर्षांनंतर जमिनीचा मोबदला मिळाला आहे. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नामुळे सदर शेतकर्‍यांना जमिनीच्या मोबदल्यापोटी सुमारे 1 कोटी 12 लाख रुपये इतकी रक्कम प्राप्त झाली आहे. कोल्हे यांच्यामुळे मागील 18 वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्‍न मार्गी लागल्यामुळे लाभार्थी शेतकर्‍यांनी कोल्हे यांचे आभार मानले आहेत.
कोपरगाव तालुक्यातील खोपडी येथील शेतकर्‍यांची जमीन नांदूर मधमेश्‍वर जलद कालव्याच्या वितरिका क्र. 2 वरील उपवितरिका क्र. 4 व 5 (डावी बाजू) साठी संपादित करण्यात आली होती. या भूसंपादन प्रकरणी अंतिम निवाडा झाल्यानंतर काही शेतकर्‍यांनी आक्षेप घेतला होता. काही शेतकर्‍यांची नावे ही भूसंपादन झालेले नसताना अंतिम निवाड्यात समाविष्ट करण्यात आल्यामुळे सरळ खरेदी प्रकरणात पुढील कार्यवाही करण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. याबाबत संबंधित शेतकर्‍यांनी जलसंपदा विभाग, भूमी अभिलेख, उपविभागीय अधिकारी तथा विशेष भूसंपादन अधिकारी, शिर्डी, नांदूर मधमेश्‍वर पाटबंधारे विभाग, वैजापूर व कोपरगाव येथील संबंधित अधिकार्‍यांकडे धाव घेऊन जमिनीचा मोबदला त्वरित देण्याची मागणी केली होती. या प्रकरणात तात्काळ कार्यवाही होत नसल्याने या शेतकर्‍यांनी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्याकडे हा प्रश्‍न मांडून न्याय मिळवून देण्याची विनंती केली होती. बिपीनदादा कोल्हे, स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांनी या प्रकरणात स्वत: लक्ष घालून खोपडी येथील या शेतकर्‍यांना जमिनीचा मोबदला मिळण्यात येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी सहकार्य केले. या प्रकरणी संबंधित अधिकार्‍यांशी पत्र व्यवहार करून सदरील शेतकर्‍यांना जमिनीचा मोबदला तातडीने देण्याची सूचना केली. यावेळी अमोल नवले, काशीराम नवले यांच्यासह खोपडी येथील सर्व लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.

COMMENTS