Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दहा हजार सायकलींचे विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या हस्ते वाटप

कर्जत/प्रतिनिधी ः आमदार झाल्यापासून मतदारसंघात आमदार रोहित पवार यांनी विविध शैक्षणिक उपक्रम राबवून मतदारसंघातील विद्यार्थी कुठेही मागे राहू नये य

पाथर्डी शहरातील  सोन्याचांदीचे व्यापारी राजेंद्र उर्फ बंडूशेठ चिंतामणी यांच्यावर खुनी हल्लाच्या निषेधार्थ उद्या शुक्रवारी पाथर्डी बंद
नागवडे सहकारी साखर कारखान्याचा हंगामाचा समारोप
धार्मिक स्थळांच्या सुरक्षेची काळजी घ्या : पोलिस निरीक्षक गायकवाड

कर्जत/प्रतिनिधी ः आमदार झाल्यापासून मतदारसंघात आमदार रोहित पवार यांनी विविध शैक्षणिक उपक्रम राबवून मतदारसंघातील विद्यार्थी कुठेही मागे राहू नये या बाबीकडे विशेष लक्ष घातले. नुकताच मतदारसंघातील गरजू विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्या-येण्याचा प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने आ. रोहित पवार यांनी अभिनव उपक्रम राबवला आहे. त्यानुसार मतदारसंघातील तब्बल 10 हजार 5 वी ते 10 वीत शिकणार्‍या शालेय विद्यार्थ्यांना रोहित पवार यांच्या संकल्पनेतून बारामती अ‍ॅग्रो व कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या सहकार्याने मोफत सायकलचे वितरण करण्यात आले.
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते कर्जत-जामखेड मतदारसंघातील तब्बल दहा हजार गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलचे वितरण करण्यात आले. परगावाहून वाड्या-वस्त्यांवरून शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात काही ठिकाणी एसटीचीही सोय नसते प्रसंगी मिळेल त्या वाहनाने अथवा पायपीट करत विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागते. तसेच सायकल घेऊन देण्याची कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नसते. अशा परिस्थितीचा परिणाम हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असतो. हीच गोष्ट लक्षात घेऊन गरजू विद्यार्थ्यांना सायकल देऊन त्यांची शाळेत येण्या-जाण्याची सोय व्हावी व शाळेत येण्या-जाण्याचा वेळ वाचावा या उद्देशाने आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून गरजू विद्यार्थ्यांना सायकल देण्यात आल्या आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात 10 हजार शालेय विद्यार्थ्यांना सायकल देण्यात आल्या असून पुढील टप्प्यात आणखी विद्यार्थ्यांना सायकल देण्याचा मानस आहे, असे सांगण्यात आले आहे.  कार्यक्रमादरम्यान सुप्रसिद्ध गायक चैतन्य देवडे यांनी आपल्या सुमधुर वाणीतील गायनाने उपस्थित विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. तसेच काही शालेय विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त करून आभार व्यक्त केले.  यावेळी बोलत असताना विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक करत आ. रोहित पवार यांनी अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना अनोखी भेट दिल्याबद्दल तसेच मतदारसंघांत सुरू असलेल्या विविध स्तुत्य कामांबाबत त्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थी उज्ज्वल भविष्यासाठी काम करणे हे आपलले कर्तव्य असल्याची भावना आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली. तसेच येत्या काळातही अशाच पद्धतीने विद्यार्थी हिताचे आणखी विविध उपक्रम मतदारसंघात राबवण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

COMMENTS