Homeताज्या बातम्यासंपादकीय

देशात पहिल्या फेरीत भरघोस मतदान ! 

देशातील १९ राज्य आणि २ केंद्रशासित प्रदेशात काल मतदान झाले. या मतदानात महाराष्ट्र आणि बिहार वगळला तर देशभरातील सर्वच राज्यांमध्ये आणि केंद्रशासित

भक्ताडाला हौस असेल, तर, होऊन जाऊ द्या चौकशी, भुजबळांची अन् आमचीही ! 
कोंबडे झाकून सुर्य रोखणारे राजकारणी!
सरन्यायाधीश ट्रोल होतात तेव्हा……..!

देशातील १९ राज्य आणि २ केंद्रशासित प्रदेशात काल मतदान झाले. या मतदानात महाराष्ट्र आणि बिहार वगळला तर देशभरातील सर्वच राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदानाची टक्केवारी ही खूप वाढलेली आहे. पश्चिम बंगालमध्ये मतदानाची टक्केवारी पाच वाजेपर्यंत जवळपास ८० टक्के च्या जवळ गेली होती. महाराष्ट्र आणि बिहार सोडून जवळपास सगळ्याच राज्यांमध्ये मतदान हे ६५ टक्क्यांच्या पुढे गेले. पारंपारिक अर्थाने जर आपण म्हटले, तर, मतदानाची टक्केवारी खूप अधिक आहे.  जेव्हाही मतदानाची टक्केवारी वाढते, त्यावेळी नेमका काय बदल होतो, हे सुज्ञ लोकांना सांगण्याचे कारण नाही! मतदानाची वाढलेली टक्केवारी म्हणजे जनतेत असलेला असंतोष असतो आणि अशा प्रकारचा असंतोष सत्ताधारी पक्षांच्या विरोधात जाणारा असतो; हे गेल्या ७५ वर्षातील गमक आहे! गेल्या दहा वर्षात भारतात स्थिरावलेली राजकीय सत्ता आणि त्या विरोधात अँटी इनकंबंसी मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक राज्यात मतदारांमध्ये उत्साह होता. अर्थात, बिहार सारख्या राज्यामध्ये मतदानाची टक्केवारी कमी होणं, हे कदाचित नितिश कुमार यांच्या राजकारणाचा आलेला कंटाळा असेल! परंतु, जे मतदान झाले आहे ते खास करून इंडिया आघाडीच्या बाजूने झाले आहे. त्यामुळे बिहारमधील मतदानाची टक्केवारी कमी असली, तरी, ती सत्ताधारी पक्षांच्या विरोधात सामोरे आलेली संख्या आहे.

महाराष्ट्रात देखील पाच मतदारसंघात मतदान झाले. मात्र, हे पाचही मतदारसंघ विदर्भात असून, विदर्भाच्या पूर्व भागात अतिशय कडक उन्हामध्ये हे मतदान झाले आहे. त्यामुळे कदाचित उन्हाचा देखील साधारणता पाच वाजेपर्यंतच्या मतदानावर परिणाम झाला असेल. अर्थात, पाच ते सात या दोन तासांमध्ये आणखी मतदान होणार असल्याने आणि शिवाय ही वेळ उन्हाची नसल्यामुळे या दोन तासांमध्ये मतदानाची टक्केवारी, देशात सर्वत्र वाढण्याची दाट शक्यता होतीच. आम्ही जी आकडेवारी दिली आहे, ती आकडेवारी साधारणतः पाच वाजेपर्यंतची आहे. त्यानंतर दोन तास पर्यंत झालेल्या मतदानाचा यामध्ये समावेश नाही. तरीही, ही आकडेवारी सांगताना आपल्याला नक्कीच पाच वाजेपर्यंतचा आकडा नमूद करायचाच असेल तर, तो या प्रकारे, अंदमान निकोबार ५६%, अरुणाचल प्रदेश ६४%, आसाम ७१ टक्के तर बिहार ४७%, छत्तीसगड आणि जम्मू काश्मीर अनुक्रमे ६४ आणि ६५ टक्के मतदान झाले. लक्षद्वीप ६० तर मध्य प्रदेश ६३% आणि महाराष्ट्रात साधारणता ५४% मतदान पाच वाजेपर्यंत झालेले होते. याव्यतिरिक्त काही राज्यांमध्ये मणिपूर मध्ये ६८% तर मेघालयात ७० टक्के मतदान झाले अर्थात मणिपूरच्या मतदानामध्ये हिंसेचा गालबोट लागला आहे. तमिळनाडूच्या ३९ जागांवर एकाच फेरीत मतदान होत असताना, तेथील मतदान पाच वाजेपर्यंत ६२% च्या पुढे गेले होते तर त्रिपुरामध्ये ७०% च्या पुढे मतदान केले होते एकंदरीत पश्चिम बंगाल हे पाच वाजेपर्यंत ७८ टक्के एवढे मतदान संपवून मोकळे झाले होते अर्थात त्यानंतर दोन तास आणखी त्यांची मतदानाची टक्केवारी निश्चितपणे वाढली. त्यामुळे एकंदरीत 1१८व्या लोकसभेसाठी च्या होणाऱ्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात झालेले मतदान हे भरघोस आहे. असेच म्हणावे लागेल त्यामुळे स्वतः स्थानी असलेल्या पक्षांमध्ये चलबिचल निश्चितपणे आढळायला सुरुवात झाली आहे.

COMMENTS