Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माध्यमकर्मींसाठी आत्मा मालिक राबविणार आरोग्य सुरक्षा योजना

कोपरगाव प्रतिनिधी -"ध्यान करो ध्यानी बनो"असा विश्वाला  संदेश देणारे कोपरगाव तालुक्यातील कोकमठाणचे आत्मा मालिक ध्यानपीठ संचलित आत्मा मालिक रुग्णाल

पैसे खाल्ल्याच्या आरोपाने संचालक व चेअरमनमध्ये वाद ; नगर अर्बन बँकेची अब्रू चव्हाट्यावर
महिलेच्या घरात अनाधिकाराने घुसून दमदाटी, गुन्हा दाखल
अहमदनगरमधील 87 हजारजणांना द्यायचाय दुसरा डोस

कोपरगाव प्रतिनिधी –“ध्यान करो ध्यानी बनो”असा विश्वाला  संदेश देणारे कोपरगाव तालुक्यातील कोकमठाणचे आत्मा मालिक ध्यानपीठ संचलित आत्मा मालिक रुग्णालयाने अहमदनगर जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्रे,सोशल मिडीया व डिजीटल माध्यमांच्या सर्व पत्रकार व त्या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आत्मा मालिक आरोग्य सुरक्षा योजना राबविणार असल्याची माहिती आत्मा मालिक ध्यानपीठाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली असुन या योजनेचा प्रचार व प्रसार करुन जिल्ह्यातील माध्यम प्रतिनिधींनी लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. जिल्हयातील सर्व वर्तमानपत्राच्या सोशल मिडीया व डिजीटल मिडीयाच्या सर्व पत्रकार  व त्या विभागाचे कर्मचारी यांचेसाठी आत्मा मालिक आरोग्य सुरक्षा योजना सन २०२३.२४ योजनेनुसार

ओ.पी.डी. व आय.पी.डी. मोफत राहणार असुन शासनाच्या सर्व आरोग्य योजनांमधून मिळणारा लाभ अधिक आत्मा मालिक आरोग्य योजनेतुन रुपये २५०००/- प्रति व्यक्ती अतिरिक्त लाभ देण्यात येणार आहे.त्यासाठी वयाची अट नसुन  पत्रकार व त्यांचे कुटूंबिय (आई-वडील, पत्नी व मुले) सर्वांना योजनेत सहभागी करुन घेतले जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत मोफत रुग्णवाहिका सेवा तसेच रुग्णांबरोबर एका नातेवाईकांस निवास व भोजनाची मोफत सुविधा व उपचारा दरम्यान 

औषधांमध्ये सर्व प्रकारच्या लॅबटेस्ट मध्ये ५०% सुट तर एक्स-रे, सि.टी. स्कॅन, यु.एस. जी व तत्सम रेडीओलॉजीकल तपासण्यांवर ४०% सुट देण्यात येणार आहे.गुरुपौर्णीमेच्या पावन मुहर्तावर १जुलै ते ७ जुलै दरम्यान दैनंदिन सकाळी साडेनऊ ते साडेपाच पर्यत सर्व रोग निदान शिबीराचे आयोजनही करण्यात आले असुन येथे येणाऱ्या रुग्णांना सर्व शासकीय सवलतींचा फायदा घेता येणार आहे.माध्यम प्रतिनिधीने रुग्ण पाठवत असल्याचे पत्र दिल्यास वैद्यकीय बिलात रुग्णास दहा टक्के सुट देण्यात येणार आहे.

आत्मा मालिक ट्रस्टने यापुर्वी करार पद्धतीने बाहेरील संस्थांना रुग्णालय चालविण्यास दिले होते.मात्र त्यांच्या व्यवस्थापनाकडून रुग्णालयाची बदनामी होईल अशी कृत्य केल्यामुळे सर्व करार संपुष्टात आणले असुन,आता आत्मा मालिक ट्रस्ट स्वतः सेवाभावी वृत्तीने रुग्णसेवा देणार असल्यामुळे रुग्णालय तज्ञ डॉक्टरांनी आणि अद्यावत सुख सुविधांनीयुक्त केले असुन,रुग्णालयाला सध्या चांगलीच झळाळी आली आहे.

COMMENTS