Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वासाठी प्रयत्न

नागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान मिळावे म्हणून प्रयत्न करीत आहे. त्यासाठी काही देशांनी समर

 50  खोके एकदम ओके चे विधानसभेत पुन्हा झळकले बॅनर 
रेमल चक्रीवादळामुळे रेड अलर्ट
मराठा समाजाचे साखळी उपोषण 25 दिवसांनंतर स्थगित

नागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान मिळावे म्हणून प्रयत्न करीत आहे. त्यासाठी काही देशांनी समर्थन दिलेले असले तरी पूर्ण सहमतीसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती विदेश मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
परराष्ट्र मंत्रालयातील या उच्चपदस्थ अधिकार्‍याने सांगितले की, जागतिक पटलावर भारताचे खूप महत्त्वाचे स्थान आहे. हे जगातील सर्व देशांना माहित आहे. ते लक्षात घेता भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान मिळाले पाहिजे, या दिशने प्रयत्न सुरू आहेत. भारत युनायटेड नेशन्समध्ये कागदपत्रांवर आधारित वाटाघाटींना अनुकूल आहे. इथे विविध मुद्द्यांवर देशांची भूमिका महत्त्वाची आहे. या परिस्थितीत, यूएनएससीचा विस्तार करण्यासाठी कसे’ आणि किती’ भागांवर एकमत विकसित करावे लागेल हे ठरवावे लागेल. या प्रक्रियेची माहिती असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासाठी ‘ग्राउंड तयार करावे लागेल’. वाटाघाटींसाठी आंतर-सरकारी वाटाघाटी अद्याप सुरू झालेल्या नाहीत. या संबंधाने काही मसुदा तयार होण्यासाठी, प्रथम काही मुद्द्यांवर व्यापक सहमती असणे आवश्यक आहे. या टप्प्यांवर एकमत झाले तरच अपेक्षित निकाल मिळू शकतो. त्यानंतर उपस्थित राहिलेल्या सदस्यांपैकी दोन तृतीयांश बहुमताचा सर्वात मोठा भाग असेल आणि यूएनएससी स्थायी जागेसाठी देशाच्या बाजूने मतदान करील असे त्यांनी स्पष्ट केले. नागरी समाज संघटना काही निषेध आंदोलनांपुरत्या मर्यादित नसून जगाच्या सामाजिक-आर्थिक विकासात रचनात्मक योगदान देणार्‍या आहेत. या नागरी समाज संस्था पृथ्वी टिकून राहाण्यासाठी सकारात्मक कृती करू शकतात असा भारताचा दृष्टिकोन असल्याचे सूत्रांनी सांगितले.

COMMENTS