Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महात्मा फुले नगर येथील माता रमाई बौद्ध विहरात माता रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृति दिना निमित्त अभिवादन करण्यात आले.

केज  प्रतिनिधी- केज शहरातील महात्मा फुले नगर भागातील माता रमाई बौद्ध विहारांमध्ये गेले अनेक दिवसापासून धम्म संस्कार वर्ग मोठ्या उत्साहात चालू आहे

आश्रम शाळेतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण
राहुरी तालुका शिवजयंती उत्सव अध्यक्षपदी घाडगे तर उपाध्यक्षपदी आरगडे
आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र

केज  प्रतिनिधी- केज शहरातील महात्मा फुले नगर भागातील माता रमाई बौद्ध विहारांमध्ये गेले अनेक दिवसापासून धम्म संस्कार वर्ग मोठ्या उत्साहात चालू आहे. या धम्म संस्कार वर्गा मध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. दिनांक 28 मे 2023 रोजी सकाळी ठीक 9:30 वाजता बौद्ध विहारांमध्ये माता रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कार्यक्रमाचे संकल्प तथा नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड तर प्रमुख पाहुणे म्हणून नंदकुमार मस्के, पोलस्ती मस्के, सचिन वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध, महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून धूप दिपानी पूजा करून वंदन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड, नंदकुमार मस्के, पोलस्ती मस्के, सचिन वाघमारे, श्रीमती तारामती शिरसट मॅडम, पुनमताई शिनगारे, गायकवाड ताई, मस्के ताई यांच्यासह महात्मा फुले नगर, आंबेडकर नगर, हाऊसिंग कॉलनी या भागातील महिला व पुरुष आणि धम्म संस्कार वर्ग शिबिरातील विद्यार्थी यांची उपस्थिती होती. यावेळी धम्म संस्कार वर्ग शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना नंदकुमार मस्के आणि पोलस्ती मस्के यांनी विद्यार्थ्यांना धम्म प्रशिक्षण दिले. यावेळी नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोडे म्हणाले की, धम्म संस्कार शिबिर चालू झाल्यापासून विद्यार्थ्यांनी या शिबिरस मोठा प्रतिसाद देऊन धम्म संस्कार वर्ग शिबिरामध्ये सहभाग नोंदीला म्हणून दिनांक 29 मे रोजी एक दिवसीय सहलीचे आयोजन स्वतः सीताताई बनसोडे यांनी केले आहे.

COMMENTS