सुरगाणा नाशिक :- जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात असलेल्या सराड गावी रविवारी १९ मार्च रोजी सायंकाळी पावणे पाच वाजेच्या दरम्यान वीज पडून सावळीराम न

सुरगाणा नाशिक :- जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात असलेल्या सराड गावी रविवारी १९ मार्च रोजी सायंकाळी पावणे पाच वाजेच्या दरम्यान वीज पडून सावळीराम निंबा भोये या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी सावळीराम भोये हे घरातील कुणालाही न सांगता आपल्या शेतात गेले होते. यावेळी सुरगाणा तालुका परिसरात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह बे मोसमी पावसानं हजेरी लावली यावेळी आंब्याच्या झाडाखाली असताना सावळीराम भोई यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान, बराच काळ होऊन देखील सावळीराम भोये हे घरी परत येत नसल्याने सायंकाळी घरच्यांनी शेतात आणि परिसरात त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली मात्र ते आढळून आले नाहीत. त्यांना भजनाचा छंद असल्याने ते भजनात गेले असावेत, सकाळी घरी परत येतील असा अंदाज घरच्यांनी व्यक्त केला होता. मात्र सोमवारी २० मार्च रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान शेतात त्यांचा शोध घेतला असता शेतातीलच आंब्याच्या झाडाजवळील खोल खड्डयात गवतात त्यांचा मृतदेह आढळून आला.
COMMENTS