पोलिस ठाण्यांमधील मुद्देमाल असुरक्षित?… होणार आता तपासणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिस ठाण्यांमधील मुद्देमाल असुरक्षित?… होणार आता तपासणी

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांमधील सोने-चांदीचे दागिने व रोख रकमेच्या मुद्देमालाच्या संरक्षणाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे

राहाता नगरपालिकेच्या पाणी साठवण तलावाजवळ आढळला मृतदेह
*18+ साठी लस नोंदणी: नोंदणी केल्याशिवाय नंबर येणार नाही, एका क्लिकवर सर्व माहिती | पहा Lok News24*
नेप्ती फाट्यावर संतप्त शेतकरी ग्रामस्थांचा भारनियमन विरोधात रास्ता रोको

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांमधील सोने-चांदीचे दागिने व रोख रकमेच्या मुद्देमालाच्या संरक्षणाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांमार्फत सर्व ठिकाणच्या मुद्देमाल तपासणीचे आदेश दिले आहेत. नगर तालुका पोलिस ठाण्यातील मुद्देमाल परस्पर बँकेत गहाण ठेवण्याचा प्रकार समोर आला होता. या पार्श्‍वभूमीवर ही विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे.
पोलिस ठाण्यांमधील दाखल गुन्ह्यांच्या तपासादरम्यान विविध प्रकारचा मुद्देमाल हस्तगत केला जातो. यातील काही मुद्देमाल गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे, वाहने या स्वरुपात असतो. तर चोर्‍या, घरफोड्या अशा गुन्ह्यांच्या तपासात आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेला किमती दागिने व रकमेचा मुद्देमालही पोलिस ठाण्यांकडे असतो. कोर्टात खटल्यांची सुनावणी पूर्ण होईपर्यंत अथवा कोर्टाकडून आदेश मिळेपर्यंत हा मुद्देमाल संबंधितांना परत करता येत नाही. त्यामुळे हा मुद्देमाल तसेच बेवारस आढळलेली वाहने मालकांचा शोध लागेपर्यंत पोलिस ठाण्यांच्याच ताब्यात असतात. यातील सोने-चांदीचे दागिने, रोख रकमा व इतर काही किंमती मुद्देमाल त्या-त्या पोलिस ठाण्यांमधील मुद्देमाल कारकून यांच्या ताब्यात असतो. नगर तालुका पोलिस ठाण्यात असलेल्या मुद्देमालातील काही दागिने संबंधित कर्मचार्‍याने परस्पर बँकेत गहाण ठेवून त्यावर कर्ज घेतल्याचे प्रकरण काही महिन्यांपूर्वी समोर आले होते. या प्रकरणी संबंधित कर्मचार्‍यावर गुन्हाही दाखल झाला आहे. त्यानंतर मुद्देमालातील सोन्या-चांदीच्या किंमती वस्तू बँकेत लॉकरमध्ये आणि रोख रकमा बँकेत स्वतंत्र खाते उघडून त्यात ठेवता येतील का, याचा विचार सुरू होता. पण त्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. या पार्श्‍वभूमीवर सर्व पोलिस ठाण्यांमधील मुद्देमालाची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे अधीक्षक पाटील यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, बेवारस असलेल्या वाहनांच्या मालकांचा शोध घेऊन ती परत करण्याचे काम सध्या सुरू आहे. तोफखाना पोलिस ठाण्यातील सुमारे 60 वाहने मूळ मालकांचा शोध घेऊन परत करण्यात आली आहेत.

COMMENTS