नवी दिल्ली : वर्ष 2023 च्या हज यात्रेसाठी 4 नवीन यात्रा प्रारंभ ठिकाणे एम्बार्केशन पॉइंट्स (एझी) मंजूर करण्यात आले आहेत, त्यात कन्नूर, विजयवाडा,
नवी दिल्ली : वर्ष 2023 च्या हज यात्रेसाठी 4 नवीन यात्रा प्रारंभ ठिकाणे एम्बार्केशन पॉइंट्स (एझी) मंजूर करण्यात आले आहेत, त्यात कन्नूर, विजयवाडा, आगरतळा आणि कालिकत यांचा समावेश आहे. हज यात्रा 2023 साठी यात्रेकरूंना 25 यात्रा प्रारंभ ठिकाणांहून (एझी) प्रवास करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. या प्रारंभ ठिकाणांची (एझी) अंतिम संख्या ही विमानतळासाठी निवडलेल्या प्रवाशांची विशिष्ट किमान संख्या आणि संबंधित पायाभूत सुविधा उभारण्याच्या व्यवहार्यतेच्या अधीन असेल.
सर्व भागधारकांच्या अभिप्रायाचा समावेश करून चांगले नियोजन करण्यासाठी मंत्रालयाने राज्य हज समित्यांसह भागधारकांबरोबर विविध संवादात्मक सत्रांचे आयोजन करून हज यात्रा 2023 ची तयारी सुरू केली. या संवादादरम्यान अधिक प्रारंभ ठिकाणांच्या (एझी) मागण्या प्राप्त झाल्या आणि अशा ठिकाणांच्या कमतरतेमुळे यात्रेकरूंना होणार्या त्रासाबद्दल चर्चा करण्यात आली. सर्व अभिप्रायांचे विश्लेषण केल्यानंतर आणि भागधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर, मंत्रालयाने हज यात्रा 2023 साठी यात्रेकरूंकडून वापरल्या जाणार्या विविध पर्यायांचा विचार करता त्यांना 25 विमानतळांची मुभा दिली आहे. हज यात्रा 2023 साठी यात्रेकरूंसाठी उपलब्ध असलेली 25 यात्रा प्रारंभ ठिकाणे (एझी) आहेत. त्यात श्रीनगर, रांची, गया, गुवाहाटी, इंदूर, भोपाळ, मंगलोर, गोवा, औरंगाबाद, वाराणसी, जयपूर, नागपूर, दिल्ली, मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, कोचीन, चेन्नई, अहमदाबाद, लखनौ, कन्नूर, विजयवाडा, आगरतळा आणि कालिकत.
COMMENTS