Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्धव ठाकरेंशी बेईमानी करु नको; अंबादास दानवेंच्या आईची ताकीद

  छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी - विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्

अब्दुल सत्तार निजामाच्या प्रवृत्तीचे ; अंबादास दानवे
राज्यभर मराठा आंदोलनाची धग कायम
समर्पित आयोगाद्वारे राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या निवेदनांचा स्वीकार

  छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत अंबादास दानवे शिंदे गटात जाऊ शकतात, असे सांगितले जात आहे. या सगळ्यानंतर मातोश्रीवरुन अंबादास दानवे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचीही चर्चा आहे. मात्र, अंबादास दानवे  यांनी या सर्व चर्चा फेटाळल्या आहेत. मी एका निवडणुकीसाठी पक्षासोबत गद्दारी करणार नाही, असे वक्तव्य अंबादास दानवे यांनी केले. यावेळी अंबादास दानवे यांना तुम्ही शिंदे गटात जाणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर दानवे यांनी म्हटले की, ज्या नेत्याबद्दल चर्चा सुरु आहे, तो मी नव्हेच! मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. मी सत्ता आणि खुर्चीसाठी हपापलेला नाही. उद्या मला पक्षाने सगळं सोडायला सांगितलं तर मी तयार आहे. मी निवडणुकीसाठी गद्दारी करणार नाही, असे अंबादास दानवे यांनी ठामपणे सांगितले. तुम्ही शिंदे गटात जाणार या चर्चेविषयी तुमच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय, असा प्रश्नही दानवे यांना विचारण्यात आला. त्यावर दानवे यांनी म्हटले की, माझी आई आमच्या कुटुंबाची प्रमुख आहे. आमच्यापेक्षा जास्त संवेदनशील ती आहे. तिने मला अगोदरच सांगितले आहे की, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाशी बेईमानी करता कामा नये. माझ्या आईचं उद्धव ठाकरेंवर प्रेम आहे. त्यामुळे मी त्यांची साथ सोडून शिंदे गटात गेलो तर तुझा आणि आमचा संबंध संपला, अशी सक्त ताकीद आईने मला दिल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले.

COMMENTS