Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजर्षि शाहू चरित्र साधने प्रकाशन समितीनेआणखी दोन ग्रंथांची निर्मिती करावी – मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : राजर्षि शाहू महाराज यांचा वैचारिक वारसा आणि राजर्षि शाहू महाराज समकालीन अशा दोन ग्रंथांची निर्मिती करण्यासाठी समितीने प्रयत्न करावेत, अशा

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यासाठी हालचाली; सुसंवादासाठी प्रयत्न सुरु असल्याची शरद पवारांची माहिती
दहिवडीत चेक बाउन्स प्रकरणी राजू शिंदे यास सहा महिन्याचा कारावास; प्रियदर्शनी पतसंस्थेला दोन लाखाची नुकसान भरपाई
मोटार वाईडींगचे दुकानातून 62 हजारांच्या साहित्याची चोरी

मुंबई : राजर्षि शाहू महाराज यांचा वैचारिक वारसा आणि राजर्षि शाहू महाराज समकालीन अशा दोन ग्रंथांची निर्मिती करण्यासाठी समितीने प्रयत्न करावेत, अशा सूचना समितीचे अध्यक्ष तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. राजर्षी शाहू चरित्र साधने प्रकाशन समितीची आढावा बैठक समितीचे अध्यक्ष पाटील यांनी घेतली. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, चर्चगेट कॅम्पस मुंबई येथे आयोजित केलेल्या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, शिक्षण संचालक(उच्च शिक्षण) डॉ. शैलेंद्र देवळाणकर, समितीचे सदस्य सचिव विजय चोरमारे, रमेश चव्हाण, दत्ता पवार आदी उपस्थित होते. यावेळी पाटील म्हणाले की, राजर्षि शाहू महाराज यांचा वैचारिक वारसा आणि राजर्षि शाहू महाराज समकालीन असे दोन ग्रंथ निर्मिती करण्यासाठी समितीने प्रयत्न करावेत. राजर्षि शाहू चरित्र साधने प्रकाशन समितीसाठी संकेतस्थळाची निर्मिती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. समितीचे सदस्य सचिव विजय चोरमारे यांनी राजर्षि शाहू चरित्र साधने प्रकाशन समितीच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली.

COMMENTS