Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नौदलाचे हेलिकॉप्टर कोसळले

मुंबई : अरबी समुद्र किनार्‍याजवळ नौदलाचे एक हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम

 छत्रपती संभाजी नगरच्या उद्योजकांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र
ऑनलाईन वीज बिल भरून बक्षिसे मिळवा ; लकी डिजिटल ग्राहक योजना
फलटणमध्ये पोलिसांचा छापा; 9 लाखाचे दिड टन गोमांसह हस्तगत

मुंबई : अरबी समुद्र किनार्‍याजवळ नौदलाचे एक हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या तिघांना वाचवण्यात आले आहे. अपघात होण्यामागील कारण समजू शकलेले नाही. मात्र नौदलाकडून घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. बुधवारी सकाळी ही दुर्घटना घडली. नौदलाचे एक हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या हेलिकॉप्टरमध्ये तीन जण होते. दरम्यान तात्काळ शोध आणि बचाव पथकाने नौदलाच्या गस्ती क्राफ्टद्वारे तिघांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले.अधिक माहिती अशी की, भारतीय नौदलाच्या स्वदेशी ध्रुव अ‍ॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टरने (एएलएच) बुधवारी मुंबईच्या किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात आपत्कालीन लँडिंग केले. नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, हे हेलिकॉप्टर मुंबईपासून नियमित उड्डाणावर होते, तेव्हा ते किनार्याजवळ उतरले. त्यामुळे तातडीने शोध आणि बचाव मोहीम हाती घेण्यात आले. ध्रुव हेलिकॉप्टरमधील तिन्ही क्रू मेंबर्सना नौदलाच्या गस्ती पथकाने वाचवले असून या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

COMMENTS