पाटण तालुक्यात पावसाचा हाहाकार; घरे-शेती-रस्त्यांसह पूलांचे मोठे नुकसान

Homeमहाराष्ट्रसातारा

पाटण तालुक्यात पावसाचा हाहाकार; घरे-शेती-रस्त्यांसह पूलांचे मोठे नुकसान

पाटण तालुक्यात पावसाने हाहाकार उडाला असून बुधवारी रात्री पासून तालुक्यास सर्वत्र मुसळधार पावसाने झोडपून काढले, या पावसामुळे अनेकांच्या घराच्या भिंती, दरडी, शेत, साकव पूल, पंप वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

निवडणूक शाखेची मोहीम ; अधिकारी जाणार मतदारांच्या दारी
नवऱ्याची शिवीगाळ अन् शेजाऱ्यांच्या मारहाणीला कंटाळून महिलेने घेतले पेटवून
आगामी काळात प्रशासकीय, पोलीस व महसूल सेवांमध्ये महिलांचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक असेल : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पाटण / प्रतिनिधी : पाटण तालुक्यात पावसाने हाहाकार उडाला असून बुधवारी रात्री पासून तालुक्यास सर्वत्र मुसळधार पावसाने झोडपून काढले, या पावसामुळे अनेकांच्या घराच्या भिंती, दरडी, शेत, साकव पूल, पंप वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

पाटण तालुक्यात मान्सुनचे दमदार आगमन झाले असून बुधवारची रात्र काळरात्र ठरली. रात्री पासुन सर्वत्र सुरू झालेला धुवांधार पाऊस गुरूवारी दिवसभर जोरदारपणे कोसळत होता. यामुळे नदी नाले, ओढे ओसांडून वाहू लागल्याने शेत शिवार पुर्णपणे जलमय झाला, तर काही ठिकाणी रस्त,फरशीपूल पाण्याखाली गेले. केरा चाफोली विभागात ढगफुटी मुळे शेती घरांचे प्रचंड नुकसान झाले चिटेघर, घाणव सह अनेक ठिकाणी ओढा, नाले शेतात घुसून सुमारे 50 एकर शेतीचे नुकसान झाले आहे.

भात नाचणीचे तरवे वाहून गेले आहेत तर चिटेघर धरणातून सांडव्यामधून पाणी म्हणजे नदीचे पात्र बदलल्याने अनेक शेती पंप वाहून गेले आहेत. यामुळे प्रचंड नुकसान झाल आहे. केरा विभागातील बोंद्री, खिवशी, चिटेघर, तामकणे, दिवशी, घाणव, बिबी, मेंढोशी, केरळ, चाफोली, आंबवणेसह आसपासच्या गावांत ढगफुटीमुळे शेतीसह घरांचे, रस्त्यांचे, मोठे नुकसान झाले आहे. तहसीलदार योगेश्‍वर टोंपे यांनी या ठिकाणी पाहणी करून लोकांना दिलासा देत पंचनामे लवकर करू असे सांगितले.

COMMENTS