Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आसमानी  संकटापुढे बळीराजा हतबल 

  छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी - अवकाळी पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, पाटोदा, वाळूज, वळदगाव, तिसगाव, आंबेलोहोळ, तुर्काबाद

फलटणमध्ये 100 एकर क्षेत्रावर फळबागेसह देशी वृक्षांची लागवड
तुळसण येथे बिबट्या दुचाकीच्या आडवा : चालक जखमी
क्षेत्र महाबळेश्‍वर येथे कोरड्या विहिरीत पडला रानगवा

  छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी – अवकाळी पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, पाटोदा, वाळूज, वळदगाव, तिसगाव, आंबेलोहोळ, तुर्काबाद खराडी, परिसरातील शेत शिवाराततील रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळीराजाच्या डोळ्यात अश्रू तरळत आहेत. सरकार केवळ घोषणा करते मात्र शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही मागील वर्षाची अतिवृष्टीची मदत अजूनही शेतकऱ्यांच्या पदरात नाही. खरीप हंगामात अतिवृष्टीने नेस्तनाबूत झालेल्या बळीराजाला रब्बी हंगामातुन आर्थिक उत्पन्नाची आस होती. मात्र, दोन दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे उत्पन्न हिरावून घेतले. शेती कसनेच सोडून द्यावे का, अशा उद्विग्न प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून उमटत आहेत.

COMMENTS