Homeताज्या बातम्या

महिलेकडून बस कंडक्टरला मारहाण

बुलढाणा प्रतिनिधी - देऊळगाव राजातील संजयनगर भागात एका वकिलाच्या बायकोनं चालत्या बसमध्ये बस वाहकाला अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घ

तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांची धाडसी कारवाई
यश फाउंडेशन लायब्ररीत पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात साजरी
शाळेतील मुलांनी घेतले जलशुद्धीकरण व अग्निशामनचे धडे

बुलढाणा प्रतिनिधी – देऊळगाव राजातील संजयनगर भागात एका वकिलाच्या बायकोनं चालत्या बसमध्ये बस वाहकाला अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. घराजवळ बस का थांबवली नाही असे म्हणून महिलेने बस चालकाला मारहाण केली. या प्रकरणी बस वाहकाच्या फिर्यादीवरून देऊळगावराजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जाफ्राबाद – छत्रपती संभाजीनगर बसमध्ये ही घटना घडली. समद तडवी असं मारहाण झालेल्या बस वाहकाचं नाव आहे. या प्रकरणी देऊळगावराजा पोलीस अधिक तपास करत आहे. मात्र हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  प्रवासी हा सर्व प्रकार पाहत होते. कुणी व्हिडीओ काढण्यात व्यस्त होते. तर कुणी त्यांना भांडणापासून कसे प्रवृत्त करता येईल, याचा प्रयत्न करत होते. पण, महिला काही थांबायला तयार नव्हती. ती खूप आक्रमक झाली होती. एक महिला बस वाहकाला माजला का म्हणून विचारना करते. घे रे याला खाली असंही म्हणते. तेवढ्यात ती दुसऱ्या कुणालाहीतरी फोन लावते. त्यानंतर सरळ वाहकाला हाताने मारहाण करते. वाहक स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतो. काही प्रवासी या महिलेला समजवण्याचा प्रयत्न करतात. ये बाई तुला काही लाच आहे की, नाही अशीही विचारना करतात. या महिलेच्या एका हातात पाण्याची बॉटल आणि दुसऱ्या हातात मोबाईल आहे. पोलीस ठाण्यात गाडी न्या, असंही काही प्रवासी म्हणतात. संबंधित महिला वाहकाला अश्लील शिविगाळ करते. एक ज्येष्ठ महिला त्यांच्यात समजोता करण्याचा प्रयत्न करते. पण, ती महिला काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही, असं या व्हायरल व्हिडीओत दिसते.

COMMENTS