Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिंदे शिवसेना अल्पसंख्याक तालुकाध्यक्षपदी मोहसीन सय्यद

जामखेड प्रतिनिधी ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचा विस्तार राज्यात विस्तार करू लागली आहे.  अल्पसंख्याक जामखेड तालुकाध्यक्षपदी तरूण कार्

मालकाच्या घरी चोरी करणारा नोकर जेरबंद
पडक्या वाड्याच्या आडोशाला सुरू होता जुगाराचा अड्डा…
एकलव्य तायक्वांदो अकॅडमीच्या 37 खेळाडूंची निवड

जामखेड प्रतिनिधी ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचा विस्तार राज्यात विस्तार करू लागली आहे.  अल्पसंख्याक जामखेड तालुकाध्यक्षपदी तरूण कार्यकर्ते मोहसीन सय्यद यांची निवड करण्यात आली आहे.
नुकतेच शिवजयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष बाबुसेठ टायर वाले यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष प्रा कैलास माने, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुस्तफा शेख,  अहमदनगर दक्षिण जिल्हा उपप्रमुख सरफराज पठाण, शहराध्यक्ष देविदास भादलकर यांच्यासह  सद्दाम सय्यद, मूज्जमिल सय्यद, साहिल मूजावर, साहील शेख, यासिर सय्यद, जहीर शेख, अफरोज पठाण, हसनभाई तांबोळी, दलित आघाडीचे गौरव सदाफुले, यूसूफ शहा, सद्दाम ईनामदार आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जरी मी अल्पसंख्याक आघाडीचा तालूकाध्यक्ष असलो तरी सर्व समाजातील तरूण सहकारी मित्रांना बरोबर घेऊन समाजाच्या विविध प्रश्‍नांसाठी व पक्षसंघटनेसाठी काम करीन असे नवनियुक्त अल्पसंख्याक जामखेड तालूकाध्यक्ष मोहसीन सय्यद यांनी सांगितले.

COMMENTS