Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 वर्धा जिल्ह्यातील अल्लीपुर मार्गावर अव्यध्य रीत्या होत आहे रेतीची वाहतूक 

वर्धा प्रतिनिधी - सध्या जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव झाले नसले तरी ह्या रेतीचे ट्रक टीप्पर अल्लीपुर मार्गावर दिवसा दीसत आहेत. जिल्ह्यात रेती

जुनी गाडी स्क्रॅप केल्यास नव्या वाहनाची नोंदणी मोफत ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली घोषणा
वाळवा तालुका गुलामगिरीतून मुक्त करा : निशिकांत पाटील
ज्याला मारायच्या त्याच्या दारात नैवद्य ठेवायचा ! बीडचा हा गोट्या गीते कोण ?

वर्धा प्रतिनिधी – सध्या जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव झाले नसले तरी ह्या रेतीचे ट्रक टीप्पर अल्लीपुर मार्गावर दिवसा दीसत आहेत. जिल्ह्यात रेती घाटाचे लिलाव झाले नसले तरी मात्र रेती वाहतूक कशी होत आहे? अशी चर्चा ग्रामस्थ बांधव करीत आहेत.  पोलीस अधीक्षक नूरल हसन हे जिल्ह्यात येताच रेती तस्करांवरती व दारू विक्रीवर मोठी संक्रांत आली होती. अव्यध्य रेती तस्करी व दारू वीक्री बंद होती.  मात्र, आता रेती घाटावरून भर दीवसा रेती ची खुलेआम वाहतूक रेती टीप्पर व्दारे होत आहे. भर दिवसा रेती चा ट्रक खुलेआम अल्लीपुर रोड वरून धावतांना दिसत आहे.  परवानगी नसताना देखील रेतीची अव्यध्य वाहतूक रोज होते.  मात्र महसुल विभाग व पोलीस विभाग यांच्यावर कारवाई का करीत नाहीत?  हे मात्र न उलघडणारे कोडच आहे. 

COMMENTS