Homeताज्या बातम्या

धुळे शहरावर आता “सीसीटीव्ही” ची नजर

धुळे प्रतिनिधी - धुळे शहरातील नागरिकांची सुरक्षितता अबाधित राखणे, धार्मिक कार्यक्रम व मिरवणुकांवर नियंत्रण ठेवणे, वाहतुकीचे नियंत्रण तसेच श

समृद्धीवरील अपघातात माजी रणजीपटूचा अपघात
तहसीलदारांनी गावात जाऊन जनतेचे प्रश्‍न सोडवावेतमहसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश ; करमाळ्यात सह दुय्यम निबंधक कार्यालयाचे उद्घाटन
पेगाससप्रकरणी मोदी सरकारच्या अडचणी वाढणार

धुळे प्रतिनिधी – धुळे शहरातील नागरिकांची सुरक्षितता अबाधित राखणे, धार्मिक कार्यक्रम व मिरवणुकांवर नियंत्रण ठेवणे, वाहतुकीचे नियंत्रण तसेच शहरातील संवदेनशील भागावर नियंत्रण ठेवण्यासाठी धुळे पोलीस दलास आता सीसीटीव्ही ची मदत मिळणार आहे.धुळे शहरातील 6 पोलीस स्टेशन अंतर्गत लावण्यात आलेल्या 116 ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे व पोलीस अधिक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षाचे लोकार्पण राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक बी. जी. शेखर पाटील, पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी एस.ऋषीकेश रेड्डी उपस्थित होते.धुळे शहराच्या सुरक्षिततेसाठी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत सन 2020-21 मध्ये 5 कोटी 36 लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात येऊन 2 कोटी 65 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला होता. या निधीतून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले. तर सप्टेंबर 2022 मध्ये फायबर नेटवर्क तयार करुन सर्व कॅमेरे नियंत्रण कक्षात कनेक्ट करण्यात आली आहे. यांचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. पुढील काळात जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS