Homeताज्या बातम्यादेश

रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया विरोधात कुस्तीपटूंचा निषेध

दिल्ली प्रतिनिधी- भारतीय क्रीडा क्षेत्रातून मोठी खळबळजनक बातमी समोर आली. ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीपटू साक्षी मलिक बजरंग पुनिया तसेच तीन वेळा

सुवर्णपदकाविनाच संपली भारताची मोहीम
फलटणला होणारे राष्ट्रीय सामने यशस्वी पार पडतील : श्रीमंत रामराजे
पुरुष आणि महिला कुस्तीपटूंच्या खुल्या निवड चाचणीचे आयोजन

दिल्ली प्रतिनिधी- भारतीय क्रीडा क्षेत्रातून मोठी खळबळजनक बातमी समोर आली. ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीपटू साक्षी मलिक बजरंग पुनिया तसेच तीन वेळा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी विनेश फोगट यांच्यासह अनेक नामांकित कुस्तीपटू दिल्ली येथे उपोषणास बसले. भारतीय कुस्ती महासंघ व महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण सिंग यांच्या विरोधात या सर्व कुस्तीपटूंनी आपल्या तक्रारींचा पाढा वाचला आहे. तसेच, विनेश व साक्षी यांनी बृजभूषण यांच्यावर महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी देशभरातील हे प्रसिद्ध कुस्तीपटू एकवटले. कुस्ती महासंघ खेळाडूंना पाठिंबा देत नसल्याचा आरोप त्यांनी लावला. तसेच, बृजभूषण यांच्या मर्जीतील अनेक प्रशिक्षक राष्ट्रीय सराव शिबिरांमध्ये प्रशिक्षण देतात व ते महिला खेळाडूंवर अत्याचार करत असल्याचे या खेळाडूंनी म्हटले. तसेच विनेशने स्वतः अध्यक्ष यांनीच अनेक मुलींचे शोषण केल्याचा गंभीर आरोप केला. तसेच त्यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे देखील तिने म्हटले. टोकियो ऑलम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देणाऱ्या बजरंगने ही संपूर्ण कार्यकारणी बरखास्त करण्याची तसेच ब्रजभूषण यांना हटवण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली. या आंदोलनात सत्यवर्त कादियान, संगीता मोर तसेच अनेक प्रशिक्षकही सहभागी झाले आहेत.

COMMENTS