Homeताज्या बातम्याविदेश

तुर्कीमध्ये भूकंपबळीची संख्या 5 हजाराच्या वर

पाचव्यांदा पुन्हा भूकंप, शेकडो इमारती जमीनदोस्त

अंकारा/वृत्तसंस्था ः तुर्कीमध्ये सुरू असलेला शक्तीशाली भूकंप काही थांबण्याचे चिन्हे नसून, मंगळवारी देखील भूकंपाचे हादरे जाणवले आहेत. आतापर्यंत तु

कर्जतचा वकील 20 हजाराची लाच घेतांना जेरबंद
राष्ट्रपिता महात्मा गांधी हे जगाचे शांतीदूत : आमदार डॉ.सुधीर तांबे
मुख्यमंत्री शिंदेंनी इर्शाळवाडीत ठोकला दिवसभर तळ

अंकारा/वृत्तसंस्था ः तुर्कीमध्ये सुरू असलेला शक्तीशाली भूकंप काही थांबण्याचे चिन्हे नसून, मंगळवारी देखील भूकंपाचे हादरे जाणवले आहेत. आतापर्यंत तुर्कीला 5 भूकंपाचे धक्के जाणवले असून, मृतांची संख्या 5 हजाराहून अधिक झाली असून, शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत.

तुर्कीमध्ये भूकंपाने जनजीवन प्रभावित झाले आहे. तुर्कीमध्ये पाचव्यांदा जमीन थरथरली असून मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. हजारों इमारतींची पडझड झाली असून ढिगार्‍यांखालून कोणी जिवंत आहे का, याचा शोध घेतला जात आहे. तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या शक्तिशाली 7.8 तीव्रतेच्या भूकंपानंतर दोन्ही देशामध्ये 100 हून अधिक वेळा आफ्टरशॉक जाणवले आहेत. पहिला आफ्टरशॉक भूकंपानंतर 9 तासांनी आला त्याची तीव्रता 7.5 नोंदवली गेली. याप्रमाणे अनेक आफ्टरशॉक जाणवले गेले. अन्य शक्तिशाली आफ्टरशॉकची तीव्रता 6 आणि 5.8 पर्यंत होती. तुर्कीसह सिरियामध्येही ठराविक अंतराने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. या भूकंपांमध्ये आतापर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत येथे भूकंपाचे चार धक्के बसले आहेत. असे असतानाच मंगळवारी पुन्हा एकदा भूकंपाचा पाचवा धक्का जाणवला. मिळालेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता 5.4 रिश्टर स्केल असून यामध्ये मोठी वित्तहानी झाली आहे. दोन दिवसांमधील हा पाचवा भूकंप असून आतापर्यंत 5 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे.तुर्की आणि सिरियामध्ये आलेल्या भूकंपामुळे मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले. या दुर्घटनेत 5000 हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर 20 हजारांहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. सर्वाधिक मृत्यू हे तुर्कीमध्ये झाले. या भूकंपामुळे अनेक गगनचुंबी इमारती या कोसळल्या. तर अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. तुर्कीचेउप-राष्ट्रपती फुआत ओकते यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 11 हजार 22 जणांचा शोध घेण्यात आला असून 7 हजार 840 जणांना ढिगार्‍यातून बाहेर काढण्यात आले आहे. तसेच अन्य देशांकडून मदतीचा ओघ तुर्कीकडे सुरू झाला आहे. भारताकडूनही दोन बचाव पथके पाठवण्यात आली असून एक डॉक्टरांची टीम देखील तुर्कीला पोहोचली आहे.

COMMENTS