Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विनातिकीट प्रवास करणार्‍यांकडून 8 लाखांचा दंड

24 तासांत 3 हजार 92 फुकट्या प्रवाशांवर कारवाई

मुंबई/प्रतिनिधी : रेल्वेच्या लोकलमधून  फुकट्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. कारण तपासणी करणारे अधिकार्‍यांची संख्या नगण्य असल्यामुळे अनेकांचे

कॉपीप्रकार थांबले नाहीत, तर राज्याचे वाटोळे
१०० सायकलस्वार करणार पाच राज्ये व बांगलादेशातून ३००० किलोमीटरचा प्रवास
दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीने गुपचूप उरकलं लग्न ?

मुंबई/प्रतिनिधी : रेल्वेच्या लोकलमधून  फुकट्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. कारण तपासणी करणारे अधिकार्‍यांची संख्या नगण्य असल्यामुळे अनेकांचे फावते. मात्र पश्‍चिम रेल्वेपाठोपाठ आता मध्य रेल्वेनेही तिकीट तपासनिसांची फौज स्थानकात तैनात करण्यास सुरूवात केल्यमुळे फुकट्या प्रवाशांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.  मध्य रेल्वेवरून विनातिकीट प्रवास करणार्‍या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. ठाणे रेल्वे स्थानकात सोमवारी सुमारे 3,092 विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. या प्रवाशांकडून मध्य रेल्वेने 8,66,405 रुपये दंड वसूल केल्याची माहिती मंगळवारी दिली. भारतीय रेल्वेमध्ये आतापर्यंतची ही एकाच स्थानकातील सर्वात मोठी कारवाई आहे. त्यामुळे नुकताच पश्‍चिम रेल्वेवरील अंधेरी रेल्वे स्थानकातील विक्रम मध्य रेल्वेने मोडीत काढून नवा विक्रमाची नोंद केली आहे.
मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांमध्ये सीएसएमटीनंतर ठाणे स्थानकाचा क्रमांक लागतो. ठाणे स्थानकातून दररोज 4.73 लाख प्रवासी येत-जात असतात. मात्र ठाणे स्थानकातून विनातिकीट प्रवाशांची गर्दी वाढल्याने तिकीटधारक प्रवाशांची गैरसोय होत होती. त्यामुळे मध्य रेल्वेने सोमवारी ठाणे स्थानकातील फलाटावर, पादचारी पुलावर, स्थानकाचे प्रवेशद्वार या ठिकाणी तिकीट तपासनीसांची फौज उभी होती. लोकलमधून प्रवासी फलाटावर उतरल्यावर त्वरित त्याचे तिकीट तपासले जात होते. महिला लोकल डब्याजवळ महिला तिकीट तपासनीस उभी होती. यासह पादचारी पुलावर दोन-दोन फुटांच्या अंतरावर एखाद्या तिकीट तपासणी कर्मचारी उभे होते. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील वरिष्ठ विभागीय वाणिज्यव्यवस्थापक अरुण कुमार, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक दीपक शर्मा, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक डग्लस मिनेझिस या तीन अधिकार्‍यांसह ठाणे स्थानकात एकूण 120 तिकीट तपासणी तैनात होते. तसेच 30 रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी होते. या तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान एका दिवसात 3,092 विनातिकीट प्रवाशांची प्रकरणे नोंदवण्यात आली. त्यांच्याकडून 8,66,405 रुपये दंड वसूल करण्यात आला. 30 सप्टेंबर रोजी पश्‍चिम रेल्वेच्या दादर स्थानकात 195 तिकीट तपासनीस तैनात करण्यात आले. यात तब्बल 1,647 विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करून 4.21 हजारांचा दंड वसूल केला. यावेळी भारतीय रेल्वेमध्ये एकाच स्थानकात आणि एकाच दिवशी सर्वाधिक दंडवसुली करण्याचा विक्रम केला. त्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी तिसर्‍याच दिवशी अंधेरी येथे 199 तिकीट तपासनीसाद्वारे 2,693 विनातिकीट प्रवशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून 7,14,055 रुपये दंड वसूल करण्यात आला. भारतीय रेल्वेमध्ये एकाच दिवशी एकाच स्थानकातील विनातिकीट प्रवाशांना पकडणे आणि त्यांच्याकडून दंडवसुली करण्याचा विक्रम तीन दिवसातच मोडला होतो. मात्र मध्य रेल्वेने पश्‍चिम रेल्वेने केलेला विक्रम सहाव्या दिवशीच मोडीत काढला. मध्य रेल्वेने एकाच दिवशी एकूण 3,092 प्रवाशांवर कारवाई करून 8,66,405 रुपये दंडवसुली केली. त्यामुळे भारतीय रेल्वेत मध्य रेल्वेच्या विक्रमाची नोंद झाली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

COMMENTS