Homeताज्या बातम्यामनोरंजन

बुर्ज खलिफावर ‘पठाण’ चा ट्रेलर

दुबई प्रतिनिधी - शाहरुख खान हा त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटामुळे सध्या चांगलाच चर्चेत आहे. एकीकडे या चित्रपटावरून वाद होताना दिसतोय तर दुसरीकडे श

टोमॅटोचे दर कोसळल्याने टोमॅटो पीक उपटले
बँकाँकहून तस्करांनी आणलेली 12 विदेशी कासवे जप्त
पिंजर्‍यात अडकलेल्या बिबट्याने दरवाजा तोडून ठोकली धूम

दुबई प्रतिनिधी – शाहरुख खान हा त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटामुळे सध्या चांगलाच चर्चेत आहे. एकीकडे या चित्रपटावरून वाद होताना दिसतोय तर दुसरीकडे शाहरुखचे चाहते त्याला चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी फार उत्सुक आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या ट्रेलर ला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. प्रदर्शनानंतर काही तासातच या ट्रेलरने यू ट्यूबवर काही मिलियन व्हूज मिळवले. तर आता नुकताच हा ट्रेलर दुबईच्या बुर्ज खलिफावर झळकला. या वेळचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बुर्ज खलिफावर पठाणच्या ट्रेलरचा स्क्रीनिंग केलं जात असताना शाहरुख खानही तिथे उपस्थित होता. या वेळेचा शाहरुखचा उत्साह पाहून सर्वच थक्क झाले. ट्रेलर बघताना त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसतच होता पण त्याचबरोबर या चित्रपटाच्या गाण्यांवरही तो तिथे थिरकला. हा ट्रेलर पाहण्यासाठी आणि शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी दुबईतील त्याचे असंख्य चाहते तिथे आले होते. किंग खानला बुर्ज खलिफावर झळकताना पाहून ते सर्वजणही फार खुश होते. त्याच बरोबर हा ट्रेलर पाहताना खुद्द किंग खान तिथे उपस्थित असल्याने त्यांच्यासाठी ते क्षण खास होते. त्यामुळे हा ट्रेलर बुर्ज खलिफावर पाहणं ही तिथे उपस्थित सर्वांसाठी एक खास ट्रीट होती.

COMMENTS