Homeताज्या बातम्यासंपादकीय

महाराष्ट्र केसरी आणि चर्चा ! 

     खेळ आणि खेळ भावना या दोन्ही गोष्टी नेहमीच चर्चेत असतात. कोणत्याही खेळामध्ये खेळाडूवृत्ती असेल, तर, हार किंवा जीत अथवा विजय किंवा पराभव, याची

बहुरंगी लढतींमागे कोण : फडणवीस की पवार ! 
कर्नाटक निवडणूक आणि लोकसभा !
तर, रामाच्या नावाने….. 

     खेळ आणि खेळ भावना या दोन्ही गोष्टी नेहमीच चर्चेत असतात. कोणत्याही खेळामध्ये खेळाडूवृत्ती असेल, तर, हार किंवा जीत अथवा विजय किंवा पराभव, याची चिंता केली जात नाही! जो उत्कृष्ट खेळ खेळतो त्याचा विजय होतो. परंतु, महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उपांत्य फेरीचा जो निकाल लागला आणि यावर जी चर्चा होतेय, ती दोन अंगाने सुरू आहे. पहिली म्हणजे या स्पर्धेत सहभागी झालेला मुळचा सोलापूरचा महाराष्ट्रातील मल्ल सिकंदर शेख याने महेंद्र गायकवाड या पैलवानाबरोबर मैदानात केलेली कुस्ती. सिकंदर शेख याला सुरुवातीपासूनच महाराष्ट्र केसरीचा विजयी दावेदार म्हणून मानले जात होते.

सिकंदर शेख चा संघर्ष, देहयष्टी आणि विनयशीलता या तिन्ही गोष्टींनी तो मैदानावर प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊ लागला. परंतु, या च स्पर्धेतील उपांत्य सामन्यात सिकंदर शेख आणि महिंद्र गायकवाड या दोन्ही मल्लांना समोरासमोर आणले गेले. महेंद्र गायकवाड उंच आणि धिप्पाड देहाचा. महेंद्र गायकवाड च्या तुलनेत सिकंदर शेख उंचीला कमी. पण देह पिळदार!  महेंद्र गायकवाडच्या तुलनेने शरीरयष्टी तशी सडपातळच मानली जाईल. कुस्तीच्या मैदानात दोन्ही पहिलवान एकमेकांना भिडताना दोघांनीही सुरुवातीला आक्रमकता दाखवली नाही. पंचांनी दोघांनाही अनेक वेळा सूचना केली की, कुस्तीत आक्रमकता आणा. परंतु, आक्रमकता आणण्याची सूचना दिल्यानंतर महेंद्र गायकवाड या मल्लाने सिकंदर शेखच्या कानावर दोन वेळा फटके दिले. यासंदर्भात पंचांनी महेंद्र गायकवाडला समजही दिली.

परंतु, या संपूर्ण कुस्तीच्या दंगलीत दोन्ही पैलवानांमध्ये जर प्रेक्षकांची मन कोणी जिंकले असेल तर ते सिकंदर शेख याने. सिकंदर शेख ने तीन वेळा महेंद्र गायकवाड बरोबर आक्रमक डावांची कुस्ती लढली आणि तिन्ही वेळा महेंद्र गायकवाड या मल्लाला सिकंदर शेखने तुलनेने डावांमध्ये अडक्लेला दिसला. सिकंदर शेख ची आक्रमकता प्रेक्षकांनी समोर पाहिल्यामुळे, परंतु प्रत्यक्षात महेंद्र गायकवाड ला विजयी घोषित केल्यामुळे प्रत्यक्षदर्शी प्रेक्षकांची निराशा झाली. त्यामुळे त्याच्या संदर्भात चर्चाही सुरू झाल्या. अतिशय बिकट किंवा संघर्षशील परिस्थितीतून पुढे आलेला सिकंदर शेख यास महाराष्ट्र केसरी या पुरस्कारापासून वंचित राहावे लागले, याची हळहळ महाराष्ट्रातील सर्वच प्रेक्षकांना लागून आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर सिकंदर शेख यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. तर, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र केसरी’चं निमंत्रण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात आलं नव्हतं. यावरून सुप्रिया सुळे यांनी शिंदे, फडणवीस सरकारला जोरदार टोला लगावला आहे. पुण्यात महाराष्ट्र केसरीची अंतिम फेरी पार पडली.

या अंतिम फेरीसाठी भाजपच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. या स्पर्धेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांनी उपस्थिती लावली. मात्र या स्पर्धेचं निमंत्रण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात आलं नव्हत. यावरून सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. खेळ हा देशासाठी असतो, कोणत्या एखाद्या पक्षासाठी नसतो, असं म्हणत त्यांनी सरकार पक्षावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. अर्थात, कुस्तीच्या स्पर्धेत बऱ्याच वेळा पंच आणि गुणक यांच्या भूमिकेवर  आरोप होत असतात, परंतु, त्यावर चर्चा फारशी होत नाही. मात्र, प्रथमच महाराष्ट्र केसरी स्पर्धा चर्चेच्या स्थानी आलीं आहे. याचाच दुसरा अर्थ असा होतो की, प्रेक्षक कोणत्याही खेळाचा प्रेक्षक म्हणून परिपक्व झाला असून त्याला फसवणं हे त्यांच्याच सहनशीलतेच्या पलिकडचे असते. प्रेक्षकांची ही परिपक्वता आगामी काळात खेळ आणि खेळभावना अधिक परिपक्व करू शकेल,यात वादच नाही!

COMMENTS