Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजय राऊत यांची सुरक्षा व्यवस्था काढल्यानंतर आता संजय राऊत यांचे खाजगी सुरक्षा रक्षक

 मुंबई प्रतिनिधी - संजय राऊत यांची सुरक्षा व्यवस्था काढल्यानंतर आता संजय राऊत यांनी खाजगी सुरक्षा रक्षक नेमले आहेत. संजय राऊत यांच्या सोबत आता खाजगी

भाजपचे टगे शिवरायांचा अपमान करून महाराष्ट्राला शहाणपण शिकवतात  
इंडियाचे नाव पुसून टाकण्याचा विकृतपणा ः संजय राऊत
राऊतांनी घेतली सत्यपाल मलिकांची भेट

 मुंबई प्रतिनिधी – संजय राऊत यांची सुरक्षा व्यवस्था काढल्यानंतर आता संजय राऊत यांनी खाजगी सुरक्षा रक्षक नेमले आहेत. संजय राऊत यांच्या सोबत आता खाजगी सुरक्षा रक्षकांची एक गाडी ही त्यांच्या संरक्षणासाठी असणार आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर संजय राऊत यांची वाय दर्जाची सुरक्षा ही काढण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक वाद निघाला असताना संजय राऊत यांनी आपल्याला धमक्यांचे फोन येत असल्याच देखील सांगितला होता. आपल्या जीवाला जर काही झालं तर त्याची जबाबदारी हे सरकारची असेल असा इशारा देखील संजय राऊत यांनी दिला होता. परंतु त्याची दखल न घेतल्यामुळे आता अखेर संजय राऊत यांना खाजगी सुरक्षा व्यवस्था घ्यावी लागली आहे. त्यामुळे यापुढे संजय राऊत हे खाजगी सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात दिसणार आहेत.

COMMENTS