नैताळे ग्रामस्थांचे आराध्य दैवत  श्री मतोबा महाराज यात्रोत्सवास प्रारंभ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नैताळे ग्रामस्थांचे आराध्य दैवत  श्री मतोबा महाराज यात्रोत्सवास प्रारंभ

नाशिक प्रतिनिधी - शाकंभरी पौर्णिमेपासून निफाड तालुक्यातील नैताळे येथे पंधरा दिवसांच्या वर चालणारी राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान व नैताळे ग

परिमल निकम यांना कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी पुरस्कार
वनपरिक्षेत्र हरसुल येथे अवैध वाहतूक करणारे वाहन जप्त
पत्रकार बाळ बोठेसह दहा जणांवर आरोप झाला निश्‍चित

नाशिक प्रतिनिधी – शाकंभरी पौर्णिमेपासून निफाड तालुक्यातील नैताळे येथे पंधरा दिवसांच्या वर चालणारी राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान व नैताळे ग्रामस्थांचे आराध्य दैवत श्री मतोबा महाराज यात्रोत्सवास आज शुक्रवार पासुन मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. औरंगाबाद राज्य महामार्गावर असलेल्या निफाड तालुक्यातील नैताळे येथील ग्रामस्थांचे अराद्य दैवत व लाखो भाविकांचे श्रध्दास्थान श्री मतोबा महाराज यांची आज शाकंभरी पोर्णिमेच्या निमीत्ताने निफाडचे आमदार दिलीपराव बनकर यांच्या हस्ते महापुजा व रथपुजा असा धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला नैताळे येथे पौष पोर्णिमेपासुन या यात्रेच्या 15 दिवसाच्या काळात राज्यभरातील भाविक  लाखोंच्या संख्येने हजेरी लावत असतात पशुधनाच्या उत्तम आरोग्यासाठी येथील अंगारा भाविक आपल्या पशुधनाला लावण्यासाठी घेऊन जात असतात.

COMMENTS