Homeताज्या बातम्या

शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचे निधन

औरंगाबाद ः शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचे निधन झाले. औरंगाबादच्या खासगी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. या रूग्ण

संभाजीनगरमध्ये पहिले शिक्षक साहित्य संमेलन
औरंगाबादमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, साडूकडून साडूचा ‘गेम’! l पहा LokNews24
महसूल सेवा उत्तम प्रकारे राबवली जात आहे -आ.बोंढारकरशिबिरात 702 डिजिटल सातबारा व  669आठ-अ उतार्‍यांचे वाटप; 10 जणांना संजय गांधी योजनेचा लाभ

औरंगाबाद ः शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचे निधन झाले. औरंगाबादच्या खासगी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. या रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. वयाच्या 102 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. केशवराव धोंडगे हे दीर्घकाळ विधीमंडळाचे सदस्य राहिले. त्यांनी आमदार आणि खासदार म्हणून लोकांचे प्रतिनिधित्व केले. विधानसभेतली त्यांची भाषणे खूप गाजली. जनतेच्या प्रश्‍नांसाठी लढणारे नेते अशी त्यांची ख्याती होती.
केशवराव धोंडगे हे पाचवेळा आमदार झाले होते तर एकदा खासदार झाले होते. मराठवाड्यातल्या जनतेचे प्रश्‍न आक्रमकपणे मांडत असल्याने त्यांना मराठवाड्याची मुलुख मैदान तोफ असेही म्हटले जात होते. कंधार तालु्क्यातल्या गऊळ या गावात त्यांचा जन्म झाला होता. समस्या सहन करणार्‍या, पिचलेल्या समाजाचे प्रश्‍न मांडण्यासाठी केशवराव धोंडगे आग्रही होते. त्यांनी अनेक आंदोलनांमध्येही सहभाग घेतला होता. त्यांनी या समाजातल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेकदा प्रश्‍न उपस्थित केले. खासदारपदी एकदा आणि पाचवेळा आमदारपद भुषवलेल्या केशवराव धोंडगे यांनी आपल्या कामाचा ठसा कायमच आपल्या आंदोलनातून आणि आपल्या भाषणांमधून तसे आपल्या कार्यातून उमटवला. निर्भीड आणि स्वाभिमानी बाणा हे त्यांचे स्वभावविशेष होते. विधानसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी ते सभागृहात उपस्थित राहात असत. राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात केशवराव धोंडगे यांचा विशेष सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांच्या शताब्दीच्या वेळीच सरकार त्यांचा सत्कार करणार होते. पण करोनामुळे हा कार्यक्रम लांबणीवर पडला होता. विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती नीलम गोर्‍हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

COMMENTS