Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची मागणी

नागपूर/प्रतिनिधी ः महात्मा फुले यांनी ज्याठिकाणी मुलींची पहिली शाळा सुरू केली, तो भिडे वाडा मोडकळीस आला आहे. भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक करून याठि

नांदेडमध्ये छगन भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न
पालखेड कालवा परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मंत्री छगन भुजबळ यांच्या जिल्हाधिकारी व अधीक्षक अभियंत्यांना सूचना
Yeola :इगतपुरी येथील ट्रेनमध्ये झालेली घटना अतिशय निंदनीय – भुजबळ (Video)

नागपूर/प्रतिनिधी ः महात्मा फुले यांनी ज्याठिकाणी मुलींची पहिली शाळा सुरू केली, तो भिडे वाडा मोडकळीस आला आहे. भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक करून याठिकाणी सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरु करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढावा यांच्यासह काही कार्यकर्ते उपोषणास बसले आहे. विधिमंडळ अधिवेशनात राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते छगन भुजबळ यांनी त्याकडे लक्ष वेधले. तसेच शासनाने ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या वयाचा विचार करता ताबडतोब भिडे वाड्याच्या स्मारकाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी आज नियम 97 अन्वये सूचना मांडली. भिडे वाड्याच्या प्रश्‍नावर सरकार गंभीर असून तात्काळ बैठक घेऊन निर्णय घेत आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्‍वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना दिले आहे.


भुजबळ म्हणाले की, भिडेवाडा येथे सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरू करण्याचा शासनाने 27 नोव्हेंबर 2021 रोजी निर्णय घेतलेला आहे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या दांपत्याने मुलींची पहिली शाळा 1 जाने 1848 रोजी पुण्यात बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात सुरू केली आणि स्त्री शिक्षणाचे बीज हिंदुस्थानात रोवले आहे. शुद्रातिशूद्र समाजासाठी ज्ञानाची कवाडे खुली करून शिक्षण क्षेत्रात त्यांनी क्रांती घडवून आणली आहे. छगन भुजबळ पुढे म्हणाले की, ही ऐतिहासिक वास्तू पुणे महापालिकेने विहित पद्धतीने ताब्यात घेवून त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी मनपाने 21 फेब्रुवारी 2006 रोजी ठराव क्र. 557 अन्वये ठराव मंजूर केलेला आहे आणि भिडे वाडयात पुणे महानगरपालिकेच्या वतीने मुलींची शाळा सुरू करण्याचा 27 नोव्हेंबर 2021 रोजी मा.उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी निर्णय घेतलेला आहे. महापालिकेने ही ऐतिहासिक वास्तू ताब्यात घेऊन या ठिकाणी सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरू करून राष्ट्रीय दर्जाचे स्मारक करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी विधिमंडळाचे लक्ष वेधले. 

COMMENTS