जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी पत्नीची पतिविरोधात तक्रार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी पत्नीची पतिविरोधात तक्रार

  नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबईतील कळंबोली मध्ये एका 43 वर्षीय महिलेने आपल्याच पती विरोधात  मनाविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यासंदर्भात तक्

श्रीदेवीचा मृत्यू कसा झाला? पती बोनी कपूर यांनी 5 वर्षांनंतर केला खुलासा
सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वासाठी प्रयत्न
गदर 2 ने मोडले सर्व रेकॉर्ड

  नवी मुंबई प्रतिनिधी– नवी मुंबईतील कळंबोली मध्ये एका 43 वर्षीय महिलेने आपल्याच पती विरोधात  मनाविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. 2006 पासून पती मंगेश बोऱ्हाडे हा पीडितेस मुलगी झाली म्हणून दारु पिऊन मारहाण करत होता. तसेच राहत घर आपल्या नावावर करावे, यासाठी देखील मारहाण करत असल्याने वारंवार होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून पीडित महिलेने आपल्या पती विरोधात तक्रार दाखल केली. कळंबोली पोलिसांनी तक्रारी वरून पती मंगेश बोऱ्हाडे विरोधात जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केल्या प्रकरणी  बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मंगेश बोऱ्हाडेला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

COMMENTS