Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजीवनीचा फुटबॉल संघ विभागीय पातळीवर प्रथम

कोपरगाव/ता.प्रतिनिधी : इंटर इंजिनिअरींग डीप्लोमा स्टुडंटस् स्पोर्टस् असोसिएशन (आयईडीएसएसए), महाराष्ट्र राज्य प्रायोजीत ई 1 झोन विभागीय सामन्य

शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार ? l Lok News24
लिनेस क्लबचे अध्यक्षपदी रोशनी भट्टड यांची निवड
BREAKING: नाशिकच्या डॉ. जाकीर हुसेन मनपा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गळती २२ रुग्ण दगावले | Lok News24

कोपरगाव/ता.प्रतिनिधी : इंटर इंजिनिअरींग डीप्लोमा स्टुडंटस् स्पोर्टस् असोसिएशन (आयईडीएसएसए), महाराष्ट्र राज्य प्रायोजीत ई 1 झोन विभागीय सामन्यांमध्ये संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकच्या फुटबॉल संघांने प्रतिस्पर्धी संघांवर दणदणीत विजय मिळवुन वर्चस्व सिध्द केले. आता हा संघ संजय घोडावत पॉलीटेक्निक, हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथे घेण्यात येणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धां जिंकण्यासाठी जोरदार तयारी करीत आहे, अशी माहिती संजीवनी पॉलीटेक्निकने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, राक्षी तालुका शेवगाव येथील ढाकणे पॉलीटेक्निक येथे विभागीय फुटबॉल सामन्यांसाठी ई 1 झोन मधिल विविध पॉलीटेक्निक व डी. फार्मसी संस्थांमधिल एकुण 15 संघांनी सहभाग नोंदविला. यात संजीवनीचा कर्णधार निखिल रमेश पाटील याच्या नेतृत्वाखाली, महेश उमेश वाघ, उत्तम कुमार, स्मिथ राहुल भावसार, अथर्व भारत वाघमारे, भावी अनंत चव्हाण, स्मीथ भाऊसाहेब लवांदे, ओम अजय मोरे, कुणाल गणेश शिंदे, आशिष चंद्रकांत साळुंखे, एम. डी. फैजानराजा, सिध्दार्थ राजेंद्र वाके, राजन आदर्श  जाधव, चित्तरंजन कुमार व एम. डी. सैफुला यांनी सलग चार सामने एकतर्फी जिंकत अंतिम फेरीत प्रवेष केला. अंतिम सामन्यात गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक, अहमदनगर संघाविरूध्द 2- 0 गोलने विजय संपादीत करत संजीवनीचा फुटबॉल संघ थेट राज्यस्तरीय स्पर्धांसाठी पात्र ठरला. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्‍वस्त सुमित कोल्हे, जीमखाना प्रमुख डी. एन. सांगळे यांनी सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना राज्यस्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच  अमित कोल्हे यांनी सर्व विजयी खेळाडूंचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर, सर्व विभाग प्रमुख, डीन्स, क्रीडा प्रशिक्षक शिवराज पाळणे व फुटबॉल कोच करणवीर बांबु उपस्थित होते.  

COMMENTS